Friday, November 29, 2024

/

सर्वांच्याच लक्षात आलाय *भिकपत्राचा हटवादीपणा*

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावात माध्यम जागृती बरीच आहे. कुठले माध्यम समाजाची निरपेक्ष प्रसिध्दी करते आणि कुठले माध्यम नेहमीच भिक मागुपणा करते हे समाजाच्या लक्षात आले आहे. आम्हाला जगवा अशी भीक मागायची आणि प्रसिद्धीच्या बाबतीत हटवादी राहायचे हे भिकपत्राचे धोरण नेहमीच जनतेच्या रोषाला कारणीभुत ठरले. आता मात्र अरे बाबा आमची प्रसिध्दी तुमच्या भिकपत्रात नको असे लोक स्वतःहून सांगू लागले. याला कारण म्हणजे त्या मुखातून बाहेर पडणारी स्वार्थी भावना आणि लागलेले भिकेचे डोहाळे.

स्थापनेपासून आपण मराठी भाषिकांचे तारणहार असा दिखावा करणाऱ्यांनी वेळोवेळी मराठी माणसाचे पाय कापण्याचे काम केले. निवडणुका आल्या की आम्हाला कुणाचा आधार नाही, आम्ही पैशाने कमी पडतो असे सांगून महाराष्ट्रात भीक मागायची आणि तो पैसा लाटायचा अशी कामे करणाऱ्यांनी वेळोवेळी हटवादी पणा करून मराठी माणसाचे खच्चीकरण केले आहे. फोटो घातले की एकादा मोठ्ठा होईल म्हणून वेळोवेळी फोटो कापायचे, कितीही काम चांगले केले तरी त्याला वाळीत टाकायचे आणि समाजापासून तोडण्याचा प्रयत्न करायचा असे करून अनेकांचे नुकसान केले आहे.

आपल्या पत्रात प्रसिध्दी दिली तरच माणसं मोठी होतात या भावनेतून अनेकांना प्रसिध्दी देणे या भिकपत्राणे बंद केले. अनेकांना सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याची कामे केली गेली त्यामुळे आता अख्खे बेळगाव या भिकपत्राच्याच विरोधात गेले आहे. जिथे जिथे मराठी माणूस काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करतो तिथे तिथे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आणि जिथे हे अस्तित्व स्वीकारले गेले किंवा नाही त्या सर्व ठिकाणी घाण करून ठेवायची असे प्रकार या भिकपत्राने केले आहेत. ही केलेली घाण सावरेपर्यंत अनेक वर्षे गेली असून बेळगावच्या साहित्य, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. मराठी उद्योजकांचे खच्चीकरण तर केलेच पण बाहेरून उद्योग आले तर आपल्यापेक्षा श्रीमंत माणसं बेळगावला येतील आणि आपले महत्त्व कमी होईल म्हणून कर्नाटक सरकारची भीती घालायची, प्रसंगी कर्नाटकातील आपल्या मित्र नेत्यांचा वापर करून परवानग्या रोखायच्या आणि जनतेला नेहमी दरिद्री ठेवायचे असली ब्रिटिश पॉलिसी या भिकपत्राने राबविली आहे.

अनेक बाबतीत सावरण्याचा प्रयत्न मराठी माणसाने केला पण ही केलेली घाण सावरता सावरेना अशी परिस्थिती आहे. नव्या जगात जगण्याची उमेद आणि उर्मीच हिरावून घेण्याचं काम या भिकपत्राने केली आहे. मराठी माणसाच्या लढ्यातील हवा काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला बांधायचे काम करणारे हे भिकपत्र म्हणजे बेळगाव आणि सीमाभागाला लागलेला एक मोठा कलंक ठरलं आहे. हा कलंक ज्यादिवशी पुसला जाईल तेथून पुढे सीमाभागात शांतता येईल आणि विकासाची वाट दिसेल यात शंका नाही.Mes politics vidhansabha

अनेकांची प्रसिध्दी रोखून केलेला हटवादी पणा या भिकपत्राला आता अडचणीचा ठरत आहे. स्वतःबरोबर नेहमीच भिकाऱ्यांची फौज घेऊन जनतेला मामा करण्याचा कारभार उघडकीला आला आहे. यामुळे ज्यांना दूर केले गेले ते मोठ्या पदांवर गेले असून ज्यांना कवटाळून घेऊन षडयंत्र साथी बनविले त्यांची अवस्था समाजात वाईट बनत चालले आहे. हाफ चड्डी गँग मध्ये असणाऱ्यांना समाज स्वीकारत नाही अशी स्थिती असल्याने भिकपत्रात प्रसिध्दी नको म्हणत अनेकजण पाठ फिरवत आहेत. मी त्यांचाच नेता म्हणून सांगत सफारीची इस्त्री मिरवणाऱ्यांनाही पद्धतशीरपणे बाजूला केले गेले आहे. यामुळे आता कमी खपाच्या भिकपत्राकडे पाठ फिरविली जात आहे.

समाज बदलला आणि नवी माध्यमे आली आणि दिशाभूल करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे खपेना झाले मग पैसा जमवायला निवडणुकीचा आधार घेत विधानसभेला एजांटगिरी केली तर लोकसभेला चाकरी सुरू झाली. समाज हे खपवून घेणार का? हे समाजानेच ठरवावे लागेल.

*मराठा समाजाचे नुकसान करणारे*  *चूकपत्र*  उद्या वाचा बेळगाव लाईव्ह

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.