Monday, December 23, 2024

/

म. ए. समितीच्या फलकाची प्रशासनाला अ‍ॅलर्जी

 belgaum

बेळगाव लाईव्ह: महाराष्ट्र एकीकरण समिती नेते रमाकांत कोंडुसकर, सागर पाटील आणि कपिल भोसले यांनी कपिलेश्वर उड्डाणपूल येथे उभारलेला मराठी भाषेतील फलक महापालिकेने पोलिस बंदोबस्तात हटवला. महापालिकेला मराठीची अ‍ॅलर्जी झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून कन्नड संघटनांनी या फलकाविरोधात तक्रार केली होती, अशी सबब सांगण्यात येत आहे.

22 जानेवारी रोजी आयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी कपिलेश्वर उड्डाणपूलाशेजारी शुभेच्छा फलक उभारला होता.

मोक्याच्या ठिकाणी उभारेला हा फलक सर्वांचे लक्ष वेधून होता. इतर राजकीय पक्षांचे फलक त्यासमोर फिके पडत होते. त्यामुळे कन्नड संघटनांनी फलकावर केवळ मराठी भाषेचा वापर करण्यात आला आहे, असा कांगावा केला. परिणामी महापालिकेने हा फलक पोलिस बंदोबस्तात हटवला आहे.या मनपाच्या कावीळ कारवाई मुळे मराठी भाषिक जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राम मंदिर उद्घाटनानिमित्त म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी 22 जानेवारी रोजी बाईक रॅली आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. त्यामुळे त्यांनी आणि सागर पाटील आणि कपिल भोसले यांनी कपिलेश्वर उड्डाणपुलाशेजारी मोठा शुभेच्छा फलक उभारला होता. हा फलक कन्नड संघटनांच्या डोळ्यात खुपल्यामुळे त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. आज महापालिकेच्या अधिकार्‍यांनी पोलिस बंदोबस्तात हा फलक हटवला.Marathi banner

मोक्याच्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोठा फलक उभारला, त्यावर केवळ मराठीमध्ये शुभेच्छा देण्यात आल्यामुळे महापालिकेने आकस बुद्धीने ही कारवाई केली आहे, असा आरोप होत आहे. मराठी भाषा प्रशासनाला खुपत असल्यामुळे ही कारवाई झाली आहे एकूणच बेळगाव शहरातून मराठी हद्दपार करण्याचा विडा प्रशासनाने उचलला असल्याचा आरोप होत आहे.

महापालिकेकडून काही दिवसांपासून शहरातील दुकानांवर 60 टक्के कन्नड भाषेत फलक लावण्यात यावेत, अन्यथा व्यापार परवाना रद्द करण्यात येईल, दुकानाला टाळे ठोकण्यात येईल, अशी नोटीस देण्यात येत आहे. शहरातील इतर भाषेतील फलक कन्नड आता म. ए. समितीच्या फलकांवर प्रशासनाची नजर पडली असून रमाकांत कोंडुसकर यांनी लावलेला फलक काढण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.