बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत मराठी भाषिकांना आरोग्याशी संबंधित देण्यात आलेल्या सवलत-सुविधेला पोटशूळ उठलेल्या कन्नड संघटनांनी ही योजना बंद करण्याची मागणी केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील महाराष्ट्र सरकारची आरोग्य योजना मंजूर झालेल्या इस्पितळाना सेवा केंद्राना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगितले त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा केली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या योजनेची संपूर्ण माहिती घेतली सदर योजना कशी अमलात आणली जाणार याचा रुग्णांना कसा फायदा होणार यांच्याविषयी माहिती घेत महाराष्ट्र शासनाच्या आदेशाच्या प्रती घेतल्या.
शासनाची ही योजना गोर गरीब गरजू रुग्णांच्या सेवेसाठी असून मराठी भाषिकांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून लागू करण्यात आली आहे केवळ समाजातील दुर्बल घटकांना मदत मिळावी या हेतूने सदर योजना लागू करण्यात आली असल्याची माहिती कागदपत्रांसह देण्यात आली. शुक्रवारी पुन्हा एकदा वरिष्ठ पोलीस अधिकारी समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडूस्कर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त सिद्ध रमाप्पा यांची भेट घेतली.तर डी सी पी रोहन जगदीश गुन्हे अन्वेषण शाखेचे ए सी पी सदाशिव कट्टीमनी यांच्याशी आरोग्य योजने संदर्भात सविस्तर चर्चा केली योजनेची माहिती दिली.
यावेळी मध्यवर्ती समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, दक्षिण विभागाचे प्रमुख कार्यकर्ते सागर पाटील,माजी नगरसेवक अनिल पाटील, नारायण सावगावकर, अमित जाधव आदी उपस्थित होते.