बेळगाव लाईव्ह :प्रगतिशील लेखक संघाचे तिसरे मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि. 28) आयोजित करण्यात आलेे असून संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे असतील. चार सत्रांत संमेलन होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आनंद मेणसे, उपाध्यक्ष अनिल आजगावकर व मधू पाटील यांनी दिली.
रेल्वे ओव्हरब्रीजजवळ, खानापूर रोड येथील आचार्य अत्रे साहित्य नगरी, तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात स. 10 वाजता संमेलन सुरु होणार आहे. आचार्य प्र. के. अत्रे यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त ‘अत्रे यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचे महत्त्व’ ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
स. 10 वा. पहिल्या सत्रात संमेलनाचे उद्घाटन पुणे येथील अन्नपूर्णा परिवारच्या प्रमुख मेधा सामंत-पुरव यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे असतील. यानंतर लेखक संघाचे सचिव कृष्णा शहापूरकर यांच्या आचार्य अत्रे : संयुक्त महाराष्ट्र आणि सीमाप्रश्न या पुस्तकासह जयसिंगपूर येथील लेखिका डॉ. सुनंदा शेळके यांच्या प्रतिभेच्या पारंब्या या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. यानंतर अन्नपूर्णा महिला मंडळातर्फे स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न कॉम्रेड अरुणा असफअली पुरस्कार ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
दुसर्या सत्रात 12.30 वा. डॉ. भालचंद्र कांगो यांचे आचार्य अत्रे आज हवे होते, या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तिसर्या सत्रात दु. 3.15 वा. शिवाजी विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील यांचे लोकशाहीला फॅसिझमचा धोका कधी असतो, या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर सातारा येथील अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. हमीद दाभोळकर यांचे निर्भय जीवन कसे जगावे? या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायं. 6 वा. प्रगतिशील लेखक संघाच्या कवींचे संमेलन होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. सुनंदा शेळके असतील.
संघाचे मार्गदर्शक कॉ. कृष्णा मेणसे, अॅड. नागेश सातेरी यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन यशस्वी करण्यासाठी संघाचे सचिव कृष्णा शहापूरकर, सहसचिव प्रा. अशोक अलगोंडी, सदस्य प्रा. दत्ता नाडगौडा, सुभाष कंग्राळकर, लता पावशे, शिवलिला मिसाळे, प्रा. मयूर नागेनहट्टी, संदीप मुतगेकर, अॅड. सतीश बांदिवडेकर, प्रा. मनीषा नाडगौडा, भरत गावडे, अॅड. अजय सातेरी, प्रा. निलेश शिंदे आदी परिश्रम घेत आहेत.
उचगावमधील (ता. बेळगाव) मराठी साहित्य अकादमीतर्फे रविवारी (दि. 14) मळेकरणी देवीच्या प्रांगणात मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. नाशिकमधील साहित्यिक प्रा. लक्ष्मण महाडिक अध्यक्षपदी राहणार आहेत. चार सत्रात रंगणार्या या संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे.
ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ होणार आहे. ग्रंथदिंडीत मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येणार आहे. जितेंद्र मांगलेकर व मनीषा मांगलेकर यांच्या हस्ते ग्रंथदिंडी उद्घाटन होणार आहे. ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे व उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे व्यासपीठाचे उद्घाटन करतील. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
पहिल्या सत्रात प्रा. महाडीक यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुसर्या सत्रात ’संत साहित्य’ या विषयावर अहमदनगरमधील ज्ञानेश्वर पठाडे यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी वनभोजनाचे आयोजन केले आहे. तिसर्या सत्रात हास्य कविसंमेलन होणार आहे. त्यात अमळनेरमधील कवी शरद धनगर, शेगांव बुलढाणा येथील कवी नितीन वरणकर व बीडमधील कवी अरुण पवार सहभागी होणार आहेत. चौथ्या सत्रात पुण्यातील बंडा जोशी यांचा हास्यपंचमी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.