बेळगाव लाईव्ह: बेळगावहून विमानाने हैदराबादला निघालेल्या लष्कर अधिकार्याच्या बॅगेत जिवंत काडतूस सापडल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्रशिक्षण काळात काडतूस चुकून बॅगेत राहिले असल्याचे तपासात आढळून आल्याने त्या अधिकार्याला काडतूसासह जाऊ देण्यात आलेआहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की बेळगावात कोब्रा प्रशिक्षणासाठी लष्करी अधिकारी बेळगावला आले होते. प्रशिक्षण संपवून ते हैदराबादला निघाले होते. सांबरा विमानतळावर त्यांची बॅग तपासली असता त्यात पिस्तूलमधील जिवंत काडतूस व काही पुंगळ्या आढळून आल्या.
त्यांना बाजूला घेऊन याची चौकशी केली असता ते वरिष्ठ लष्करी अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले. काडतूस चुकून बॅगेत राहिल्याचे सांगितल्यानंतर त्यांना जाऊ देण्यात आले अशीही उपलब्ध झाली आहे.