बेळगाव लाईव्ह :राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी गोकाक येथील दलित संघर्ष समिती व इतर दलित संघटनांच्या नेत्यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दलित समुदायाचे नेते रमेश मादर यांनी सतीश जारकीहोळी हे नि:स्वार्थ वृत्तीने समाजाच्या हितार्थ सातत्याने विविध कार्यक्रम राबवत असतात.
प्रगत विचारसरणीचे जारकीहोळी शोषित एससी, एसटी, मागासवर्ग आणि अल्पसंख्यांक समाजाचा सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय उत्कर्ष व्हावा यासाठी सतत झटत असतात.
आजपर्यंत समाजहितासाठी प्रचंड कार्य केले असल्यामुळे काँग्रेस पक्षाने सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री पद दिले पाहिजे असे मादर यांनी स्पष्ट केले.