Thursday, January 2, 2025

/

आयसीएआय बेळगाव शाखेतर्फे विशेष कार्यक्रम

 belgaum

बेळगाव लाईव्ह :इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बेळगाव शाखेतर्फे आयोजित ‘स्टार्टअप संवाद आणि एमएसएमई सहयोग’ हा विशेष कार्यक्रम आज गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

शहरातील आयसीएआय भवनामध्ये आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध उद्योजक दिलीप चांडक उपस्थित होते. त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात स्टार्टप्स आणि व्यवसायांच्या यशामधील चार्टर्ड अकाउंटंट्सच्या महत्त्वाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

ऑटो ॲक्सेसरीज आणि रस्ते सुरक्षा उत्पादन निर्मिती क्षेत्रात बेळगाव शहराचे नांव जगाच्या नकाशावर आणण्यामध्ये चांडक यांनी स्मारकीय भूमिका बजावली आहे. प्रारंभी आयसीएआय बेळगाव शाखेचे अध्यक्ष सीए एम. एस. तिगडी यांनी चेंबर ऑफ कॉमर्स बेळगाव, लघु उद्योजक संघटना बेळगाव, लघुउद्योग भारती आदी उद्योग, व्यवसाय अशा सर्व क्षेत्रातील उपस्थितांचे स्वागत करून त्यांना चार्टर्ड अकाउंटंट्सच्या एमएसएमई क्षेत्रातील भूमिकेविषयी अवगत केले.Chartard account

तसेच स्टार्टप्ससाठी एकसंध परिसंस्था उभारणीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट कशाप्रकारे मदत करू शकतात याची माहिती दिली. त्याचप्रमाणे जगामध्ये शाश्वत अहवाल मानकांची ओळख करून देणारे भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स पहिले आहेत, असे सीए तिगडी यांनी स्पष्ट केले.

यावेळी सीए योगेश कुलकर्णी यांनी स्टार्ट अपसाठी निधी उभारण्यासंदर्भात पेपर सादर करण्याबरोबर चार्टर्ड अकाउंटंट्स हे बेळगाव मधील स्टार्टप्सना मार्गदर्शन करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून कशी मदत उपलब्ध करून देऊ शकतात, याबद्दल विचार व्यक्त केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.