Friday, January 10, 2025

/

स्वतःच्या वैवाहिक खाजगी क्षणांचा अश्लील व्हिडिओ बनवणारा पती गजाआड

 belgaum

बेळगाव लाईव्ह :संपूर्ण समाजाला जबरदस्त धक्का देणारी आणखी एक निंद्य घटना बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत खुद्द पतीनेच आपल्या पत्नी सोबतच्या एकांतातील वैवाहिक खाजगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तिला ब्लॅकमेल करण्याचा माणुसकीला काळीमा फासणारा नीच प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. सध्या तो नराधम पती जेलची हवा खात आहे.

याबाबत समजलेली थोडक्यात माहिती अशी की, पत्नीने आपल्याला दुसऱ्या लग्नाची परवानगी द्यावी यासाठी तिच्या सोबत एकांतात घालवलेल्या वैवाहिक खाजगी क्षणांचे अश्लील फोटो काढून व व्हिडिओ तयार करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार शहरातील किरण पाटील या नराधमाने केला असल्याचे उघडकीस आले आहे.

लग्नाला परवानगी दे अन्यथा तुझे माझ्यासोबतचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो असे किरणने जेंव्हा पहिल्यांदा धमकावले तेंव्हा त्याच्या पत्नीला मोठा धक्काच बसला. त्यानंतर तिने अनेक वेळा आपल्या पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.Police logo

मात्र त्याने आपला ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरूच ठेवल्यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने नाईलाजाने तडक पोलीस ठाण्याचा रस्ता धरला.

तिने जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस चौकशी आणि तपासात किरण पाटील यांच्या मोबाईलमध्ये त्याच्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळून आले. परिणामी पोलिसांनी किरण याला तात्काळ अटक करून वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.