Saturday, January 11, 2025

/

10 लाखांचा हुंडा मागणाऱ्या वराला खायला लागली जेलची हवा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : हुंडा मागितल्याने एका वराला जेलची हवा खायला लागली आहे.बेळगाव जिल्ह्यातील खानापूर शहरात ही घटना घडली असून हुंडा मागितल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर तुरुंगात टाकण्यात आले आहे याची पुष्टी मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांनी केली.

खानापूर शहरात ही घटना घडली, ज्यामुळे सचिन पाटील या वराची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न ठरवताना वधूच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला वराला ५० ग्रॅम सोने आणि एक लाख रुपये हुंडा देण्याचे मान्य केले होते. लोकमान्य सभागृहात हे लग्न होणार होते. मात्र, लग्नाची तारीख जवळ आल्याने वराच्या कुटुंबाने अनपेक्षितपणे 100 ग्रॅम सोने आणि 10 लाख रुपये रोख वाढवण्याची मागणी केली.

त्यावर वधूच्या कुटुंबीयांनी ही नवीन मागणी मान्य करण्यास नकार दिल्यावर आरोपी सचिन पाटील याने लग्न मोडले होते त्यानंतर लग्नासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केलेल्या वधूच्या कुटुंबीयांनी वराच्या विरोधात खानापुर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे पोलिसांनी वराला पकडले आणि नंतर त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.

हुंडा मागणे कायद्याने गुन्हा असताना समाजात इतक्या मोठ्या प्रमाणात हुंडा मागितला आणि दिला जातो क्वचितच एखादी पोलीस केस बनते मात्र समाजात खरोखर हुंडा देणे किंवा घेणे बंद व्हायचे असेल तर समाजातून सामूहिक जनजागृती होणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.