राज्यपालांनी ‘तो’ अध्यादेश फेटाळला नाही -सचिवांचे स्पष्टीकरण-व्यावसायिक नामफलकांमध्ये 60 टक्के कन्नड भाषेच्या वापरासंदर्भातील ‘कर्नाटक भाषा समग्र अभिवृद्धी अध्यादेश -2024’ कर्नाटकचे राज्यपाल
थावरचंद गहलोत यांनी फेटाळला नसून तो राज्याच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यासाठी राज्य सरकारकडे परत पाठवला आहे, असे स्पष्टीकरण राज्यपालांचे खास सचिव आर. प्रभू शंकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.
राज्यपालांनी कर्नाटक भाषा समग्र अभिरुद्धी अध्यादेश -2024 फेटाळल्याचे वृत्त वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेल्सवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रत्यक्षात तसे नसून संबंधित अध्यादेशाला प्रथम राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी घ्यावी असा सल्ला देऊन तो
अध्यादेश राज्य सरकारकडे परत धाडण्यात आला आहे. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील महिन्यात 12 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. तशी अधिसूचना यापूर्वीच निघाली आहे, असे राज्यपालांचे खास सचिव आर. प्रभू शंकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.