बेळगाव लाईव्ह :क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा आणि भिमांबिका सहकारी पतसंस्थांत सुमारे ४०० हून अधिक कोटींचा अपहार झाला. हजारो ठेवीदारांच्या घामाचा पैसा अडकून पडला. आता न्यायालयाच्या सुचनेनंतर संस्थेच्या मालमत्ता विकून ठेवीदारांना ठेवी परत देण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. पण, ही पडताळणी बंगळुरात करण्यात येत असल्याने ठेवीदारांची चांगलीच फरफट होत आहे.
संगोळ्ळी रायण्णा आणि भिमांबिका सोसायटीच्या ठेवीदारांची कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती झाली
आहे. पण, ही पडताळणी बंगळूरमध्ये होत आहे. त्यासाठी वृत्तपत्रांत जाहिरात देऊन आवश्यक कागदपत्रांसह बंगळूरला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गेल्या चार बहन दिवसांपासून बेळगाव परिसरातून हजारो
ठेवीदार बंगळूरला गेले आहेत. त्याठिकाणी पहाटे पाच वाजता उठून रांगेत थांबावे लागत आहे. दिवसभर रांगेत थांबावे लागत आहे. आपलेच पैसे परत मिळविण्यासाठी लोकांना मोठी फरफट करावी लागत आहे.
लोकांच्या सोयीसाठी बेळगावात कागदपत्रांची पडताळणी करणे ार आवश्यक होते. पण, बंगळुरात रो पडताळणी होत असल्यामुळे लोकांना
त्रास सहन करावा लागत आहे. या दोन्ही संस्थांत प्रामुख्याने निवृत्त कर्मचाऱ्यांनी ठेवी ठेवल्या होत्या. त्यांना आरोग्याच्या समस्या आहेत. तरीही पैशांसाठी त्यांना कार्यालयासमोरच झोपून तासनतास रांगेत थांबावे लागत आहे. या प्रकारामुळे लोकांत नाराजी आहे. अपहार झालेल्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी लोकांतून होत आहे.
याआधीही कागदपत्रांची पडताळणी
दोन्ही सोसायटीच्या ठेवीदारांनी याआधीही तपास अधिकाऱ्यांना कागदपत्रे सादर केली आहेत. आता पुन्हा पडताळणीसाठी बंगळुरात बोलावले असल्यामुळे हेलपाटे मारावे लागत आहेत, असा आरोप ठेवीदारांतून होत आहे.