बेळगाव लाईव्ह :पिरनवाडी पट्टनपंचायतीची निवडणूक लवकर घेण्यात यावी आणि या पट्टन पंचायतीवर नियुक्त मुख्य अधिकाऱ्याची तात्काळ बदली करावी अशी मागणी बेळगाव दक्षिण काँग्रेस ब्लॉक अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष राकेश तल चवार यांनी केली आहे.
नगर प्रशासन मंत्री के आर रेहमान खान यांना लेखी स्वरूपाचे प्रत्यक्ष भेटून निवेदन देत तलवार यांनी सदर मागणी केली आहे. रेहमान खान मंगळवारी बेळगाव भेटीवर होते त्यावेळी त्यांनी भेट घेत सदर मागणी केली आहे.
पिरनवाडी गावचा पट्टन पंचायतीत समावेश होऊन तीन वर्षे झाली आहेत तरीही अद्याप निवडणूक घेण्यात आली नाही. नवीन सभागृह अस्तित्वात नसल्याने या गावचा विकास खुंटला आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारचे काम व्हायला तयार नाही याचा ग्रामस्थांना त्रास होत आहे असे निवेदनात नमूद केले आहे.
या पट्टन पंचायतीचे मुख्याधिकारी हनुमंतप्पा मानोवड्डर यांची तात्काळ अन्यत्र बदली करण्याची मागणी देखील त्यांनी मंत्र्यांकडे केली आहे.या भागातील लोकांची कामे व्यवस्थित होत नसून सदर अधिकारी जनतेसोबत सलोख्याचे संबंध स्थापित करण्यात अयशस्वी झाले आहेत
याचा जनतेला त्रास होत आहे अशी मागणी देखील मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी राकेश तलवार यांच्यासह सचिन राऊत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.