बेळगाव लाईव्वरकारच्या मार्गसूचीनुसार महापालिकेत 100 सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. 5) डोक्यावरून मैला वाहणे निषेध, पुनर्वसन कायदा 2003 च्या अंमलबजावणीसाठी आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते.
यावेळी सफाई कामगार नेते विजय निरगट्टी यांनी जिल्ह्यात 368 सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याचे आदेशपत्र देण्यात आले आहे, ही समाधानाची बाब आहे. याच प्रकारे 353 सफाई कामगारांना घरकुलांचे हक्कपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी पाटील यांनी, 353 घरकुलांबाबत महापालिकेकडून सर्व्हे सुरू आहे. त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना घरकूलांचे हक्कपत्र देण्यात येणार आहेत, असे सांगितले. आतापर्यंत 383 जण डोक्यावरून मैला वाहून नेणारे असल्याची ओळख पडली होती. त्यांना ओळखपत्र देण्यात यावे, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, जिलहा नगरविकास योजना संचालक मल्लिकार्जुन कलादगी, समाज कल्याण सहसंचालक लक्ष्मण बबली आदी उपस्थित होते.