Saturday, January 4, 2025

/

पावसासह वातावरण बदलामुळे कडधान्य पिके धोक्यात

 belgaum

बेळगाव लाईव्ह : मागील वर्षी झालेल्या कमी पावसामुळे एक तर पावसाळी पिके गेली आहेत आता बेळगाव परिसरामध्ये हिवाळी पीकही पिकावर पडलेल्या रोगामुळे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यावर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊ लागला असून एक दोन दिवसात ठीकठिकाणीं पावसाच्या सरी व ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील कडधान्य पिके धोक्यात आली आहेत. याखेरीज पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

सातत्याने वातावरण बदलाचा पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. आधीच्या खरीप हंगामात दुष्काळ पडल्याने रब्बी हंगामावर काहीशा अपेक्षा आहेत. मात्र आता रब्बी हंगामात देखील बदलत्या वातावरणामुळे पिकांविषयी चिंता निर्माण होऊ लागली आहे.

बेळगांव जिल्हा व तालुक्यामधील मसूर, हरबरा, वाटाणा, कडपालवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आणखी एका नव्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. आधीच या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भात पिकं व्यवस्थित आले नाहीत. काही शेतकऱ्यांनी शेतीमध्येपाणी सोडून कडपाल पेरणी केलेली आहे. तथापि सततच्या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना दोबारा नुकसानीचा सामना करावा लागत आहे.Farmers crop

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 2.5 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यामध्ये मसूर, वाटाणा, हरभरा, सूर्यफूल, तंबाखू, ज्वारी, मका आदी पिकांची पेरणी झाली आहे. मात्र वातावरणात बदल होत असल्याने पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. कधी थंडी तर कधी गर्मी तर कधी पाऊस पडत असल्यामुळे पिके धोक्यात येऊ लागली आहेत.

अधून मधून पावसाचा शिडकावा होत असल्याने कडधान्य काळे पडण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या पावसाने चिंता वाढविली असून पावसाच्या सरी कोसळल्याने सुका चारा खराब होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास येत्या काळात ओल्या बरोबरच सुक्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकऱ्यात चिंता व्यक्त होत आहे.

*ऐन थंडीच्या हंगामात बेळगावकरांना पावसाळ्याचा ‘फिल’*

बेळगाव : थंडीच्या हंगामात बेळगावकरांना पावसाळ्यातील ‘फिल’ आज मंगळवारी सकाळी अनुभवता आला. सकाळी ढगांनी आकाश भरून गेले आहे. काल सोमवारी सायंकाळी शहराच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरीही कोसळल्या आणि पावसाने जमीन ओली केली. आज व उद्या राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

सध्या अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती पहायला मिळत आहे. त्यामुळे उत्तरेकडून थंड वारे येत असून पूर्वेकडून आर्द्रतायुक्त वारे येत आहे. त्यामुळे पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.