Monday, December 23, 2024

/

बेळगावच्या तिळगुळ दागिन्यांना वाढली मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पारंपरिक कला व संस्कृती जपल्याने येथे विविध उत्सवांचे वेगळेपण आधुनिक युगातही टिकून आहे. मकर संक्रांतीनिमित्त येथे तयार होणारे तिळगुळांचे दागिने वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहेत. दिवसेंदिवस या दागिन्यांना मागणी वाढत असून दरवर्षी लाखो रुपयांचे तिळगुळाचे दागिने विदेशात विकले जातात. १९४२ पासून बेळगावात सुरु झालेली ही परंपरा आजही तितक्याच कलात्मकतेने सुरु आहे.

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येथील बाजारात २५ हून अधिक प्रकारचे दागिने ग्राहकांचे मन वेधून घेत आहेत. १९४२ मध्ये येथील परांजपे घराण्यातील पुरुषांनी तिळगुळाचे दागिने तयार करण्यास सुरूवात केली.

आज या व्यवसायातअनेक महिला कार्यरत आहेत. दरवर्षी येथून सुमारे ३० लाख रुपयांच्या तिळगुळांचे दागिन्यांची विदेशात निर्यात होते. याची एकूण उलाढाल ६० लाख रुपये आहे. यातून शेकडो लोकांना काम मिळत आहे. रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवसापासूनचसाखर आणि पाणी यांच्यावापराने तिळगुळ तयार करण्यास प्रारंभ होतो.

येथील राधिका बर्वे यांची तिसरी पिढी या न विशेष व्यवसायात कार्यरत आहे. वडील रेखा साठे व विजय साठे यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले. शाहूनगर येथील भाग्यश्री चोरगे व सुवर्णा रायकर, स्वाती बैलूर, आरती आनुरे, कचेरी गल्लीतील भाग्यश्री कुलकर्णी आदी महिला या व्यवसायात कार्यरत आहेत.Til gul dagine

सध्या अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलियासह
अन्य देशांमध्ये तसेच चेन्नई, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात या
दागिन्यांना मागणी आहे. मुलांचा पहिला वाढदिवस, बोरन्हाण तसेच गर्भवतींच्या डोहाळे
जेवणाला तिळगुळाचे दागिने खरेदी केले जातात.
तिळगुळांपासून कंबरपट्टा, मंगळसूत्र,
पोहेहार, लक्ष्मीहार, बाजुबंद, नथ, कर्णफुले, अंगठी, बासरी, मांगटिक्का तसेच पुरुषांसाठी लागणारे हार, घड्याळकडे, कंठी असे एकूण हून अधिक प्रकारांत दागिने तयार केले जातात.

कारागीर राधिका बर्वे यांनी बेळगाव लाईव्ह शी बोलताना सांगितले की गेल्या १४ वर्षांपासून तिळगुळाचे दागिने तयार करत आहे. यातून
अनेकांना रोजगारही मिळत आहे. मात्र, या
व्यवसायात नव्या पिढीतील सदस्यांची
संख्या कमी होत आहे. दरवर्षी शहर
उपनगरात तिळगुळांच्या दागिन्यांतून सुमारे
५० लाख रुपयांची उलाढाल होते.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.