बेळगाव लाईव्ह :लोकसभा निवडणुकीत बेळगाव मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आपला उमेदवार पाहिजेच म्हणणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. बेळगाव live ने घेतलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात ७४ टक्के मतदारांनी होय, पाहिजेच हा ऑप्शन निवडला आहे. विशेष म्हणजे live ने ऑफलाईन सर्व्हे ही केला असून त्यामध्येही ८५ टक्क्यांहून अधिकांश लोकांनी आपला उमेदवार हवाच असे मत व्यक्त केले आहे.
बेळगाव लाईव्ह च्या ऑनलाईन सर्वेक्षणामध्ये तब्बल बाराशे जणांनी मतदान केले आहे. यापैकी बहुतांश लोकांचा कल हा लोकसभा निवडणुकीत मराठी अर्थात महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार असावा, याकडे आहे. मराठी लोकांचा मूड निवडणूक लढवा असा आहे. लढेंगे तो बचेंगे अशा पद्धतीने लोक आपले प्रतिक्रिया देत आहेत. मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नमुने मिळाले असून एक नवा ट्रेंड सेट होऊ लागला आहे. मागील लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव लाईव्ह ने केलेला प्रयोग या लोकसभा निवडणुकीत पूर्णपणे यशस्वी होणार असे चित्र निर्माण झाले आहे.
बेळगाव लाईव्ह ने ऑनलाईन बरोबर ऑफलाइन पद्धतीने ही जनतेचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला, सार्वजनिक ठिकाणी, बस स्टॉप, पाणी भरण्याची स्थळे ग्रामीण आणि शहरी भागातील सार्वजनिक ठिकाणी जाऊन बेळगाव live प्रतिनिधींनी नागरिकांचा कल जाणून घेतला आहे.
राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना यापूर्वी निवडून देऊन त्यांनी मराठीच्या रक्षणाकडे दुर्लक्ष केले आहे. कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो निवडून येईपर्यंत मराठी बोलतो, मात्र त्यानंतर मराठीच्या हक्क, न्याय आणि सन्मानासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे आपला उमेदवार हा किती मते घेतो यावर किमान मराठीचे अस्तित्व तरी टिकून राहील. अशा पद्धतीची भाषा सर्वसामान्य नागरिकांनी बोलून दाखवली आहे.
विशेषतः महिला वर्गात आपला उमेदवार असावा. आपल्यातला तरुण कार्यकर्ता खासदार पदाच्या निवडणुकीत सहभागी व्हावा असे मत व्यक्त होऊ लागले आहे.
वृद्ध आणि सोशल मीडियापासून वंचित असलेल्या घटकांना खास भेटण्याचा प्रयत्न बेळगाव लाईव्ह ने केला यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आमच्या अस्मिता आणि जिवंत असेपर्यंत महाराष्ट्र जाण्याचे स्वप्न जर पूर्ण व्हायचे असेल तर महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला उमेदवार देण्याची गरज यावेळी बेळगाव लाईव्ह कडे व्यक्त केली.
विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर जर सीमा प्रश्न प्रकर्षाने सामोरा जायचा असेल तर त्यासाठी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभेसाठी आपला उमेदवार द्यायलाच हवा. असे मत अनेक जाणकार सदस्यांनी व्यक्त केले.
या ऑनलाइन पोल मध्ये मतदान करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये आपले मत व्यक्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. खाली या पोलची लिंक देण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांनी आपले मत द्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.