बेळगाव लाईव्ह:कॅण्टोन्मेंट बोर्डाला सोमवारपासून (दि. 8) कायमस्वरुपी सीईओ मिळणार आहे. नवनियुक्त सीईओ राजीवकुमार शनिवारी (दि. 6) रात्री उशीरा बेळगावात दाखल झाले असून ते सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत.
आनंद के. यांनी 25 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केल्यानंतर सीईओपदावर आतापर्यंत तीन प्रभारींची नियुक्ती झालेली आहे. मात्र, कायमस्वरुपी सीईओ मिळाला नव्हता. अखेरीस 2015 च्या बॅचचे ( आय डी ई एस IDES) अधिकारी राजीवकुमार यांची 1 डिसेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारण्यासाठी महिनाभराचा वेळ घेतला.
अखेरीस ते बेळगावात दाखल झाले असून सोमवारी पदाची सूत्रे हाती घेतील. त्यामुळे, कॅण्टोन्मेंट बोर्डची रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
कर्मचारी नियुक्ती झालेल्या भ्रष्टाचार आरोपाची सी बी आय चौकशी दरम्यान तत्कालीन सी ई ओ के आनंद यांनी आत्महत्या केली होती त्यानंतर बेळगाव कॅटोंमेट बोर्ड चर्चेत आले होते.