बेळगाव लाईव्ह:1956 साली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, 1969 साली मुंबईत आंदोलनात आणि 1986 साली कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हुतात्मा पत्करलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन केले जाणार आहे. बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात,कंग्राळी खुर्द येथे तालुका समितीच्या वतीने तर खानापूर निपाणी येथे बुधवारी 17 रोजी अभिवादन केले जाणार आहे.या निमित्ताने गेल्या 40 वर्षात सीमा लढ्यातील जगदीश कुंटे यांच्या व्यंग चित्राचे प्रदर्शन मराठा मंदिरात होणार आहे तर गोवा वेसचा राजा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या हुतात्माना प्रतिवर्षाप्रमाणे १७ जानेवारी रोजी अभिवादन करण्यात येणार आहे. सीमावासियातर्फे बुधवार दिनांक १७ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता कंग्राळी खुर्द येथील हुतात्मा बाळू निलजकर यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर कंग्राळी खुर्द वेशीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर,हुतात्मा चौक येथे हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.यानंतर महात्मा फुले मंगल कार्यालय येथे हुतात्माना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे.तरी या कार्यक्रमाला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सीमातपस्वी भाई एन डी पाटील यांना अभिवादन
सीमाभागाचे आधारवड, सीमातपस्वी भाई एन डी पाटील यांचा द्वितीय स्मृतिदिन बुधवार दिनांक १७ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता तालुका म ए समितीच्या कॉलेज रोड येथील (पवन हॉटेलच्या बाजूला)कार्यालयात गांभीर्याने करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमाला सीमाभागातील समस्त सीमावासीयांनी, मराठी भाषिकांनी,बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहर समितीचे आवाहन पोलीस अधिकारी बैठक
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 17 जानेवारी 2024 रोजी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी होणार आहे या कार्यक्रमास संदर्भात पोलीस खात्याच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळीची आज सायंकाळी कॅम्प येथील सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण कुमार कोळळूर आणि खडेबाजार पोलीस स्टेशनचे सीपीआय विजय निंबाळकर यांच्याशी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली समितीचे कार्यक्रम अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडा अशी विनंती पोलीस खात्यातर्फे करण्यात आली समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अभिवादनाचा कार्यक्रम कशाप्रकारे होतो याची माहिती घेतल्यानंतर सर्वांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करावी व अभिवादन कार्यक्रम पार पाडावा ठरलेल्या मार्गाने जाऊन योग्य ती खबरदारी घेऊन कार्यक्रम यशस्वी करावा अशी विनंती ही पोलिसांनी केली बेळगाव आतील सर्व जनतेने हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समिती च्या वतीने करण्यात आले आहे.