बेळगाव लाईव्ह :सध्याचे काँग्रेस सरकार हिंदुत्व विरोधी आहे. आयोजित राममूर्ती प्रतिष्ठापनेचे कार्य जोरदार होणार आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अकारण जुने खटले उकरून काढून गुन्हे दाखल करण्याचे काम काँग्रेस सरकारने सुरू केले आहे हा अत्यंत चुकीचा कारभार असून अन्याय आहे. काँग्रेस सरकार हिंदुत्व विरोधी आहे. असा आरोप भाजप बेळगाव जिल्हा महिला ग्रामीण विभागाच्या अध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांनी केला आहे.
बुधवारी काँग्रेस सरकारच्या विरोधात बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. सोनाली सरनोबत यांनी हा मोर्चा कशासाठी आयोजित केला आहे त्याची माहिती दिली. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तसेच भाजपच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून अन्यायकारक परिस्थिती निर्माण केली जात असल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला.
हा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नसल्याचे डॉक्टर सोनाली सरबत यांनी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगितले. कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. हे सरकार हिंदुत्व विरोधी कारवाया करू लागले आहे.
राम जन्मभूमीत राम मूर्तीचे प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्व जपणाऱ्या कार्यकर्त्यांना टार्गेट केले जात आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. असा इशारा त्यांनी दिला.