बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील अनेक पोलीस स्थानकात चोरीचे गुन्हे असलेल्या न्यायालयीन आवारातून पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे.
गुरुवारी दुपारी बेळगावच्या जे एम एफ सी कोर्टातून पळून गेलेला अब्दुल गनी हा टिळकवाडी पोलिसांच्या नजरेतून सुटला खरा मात्र अखेर हिरेबागेवाडी पोलिसांच्या हाती लागला.
हिरे बागेवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल बबन्नाआणी नागाप्पा सुतगट्टी यांनी आरोपींना मोमीन गल्ली, हिरेबागेवाडी येथे अटक केली.
कोर्ट मधून पलायन केल्याने त्याच्या विरुद्ध मार्केट स्टेशनमध्ये गुन्हा क्र. 11/2024, 224 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच्यावर एपीएमसी, बेळगाव ग्रामीण, उद्यमबाग आणि टिळकवाडी येथे घरफोडीचे 5 गुन्हे दाखल असून त्याची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. काही तासातच त्याला पकडलेल्या हिरेबागेवाडी पोलिसांना पोलीस आयुक्तांनी जवानांना ५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.