बेळगाव लाईव्ह : बेळगाव आश्रय कॉलनी नानावाडी येथील श्री आय्याप्पा मंदिर मधील मूर्तीवरील चांदीचे दोन किलो वजनाचे कवच आणि सोन्याचा मुलामा दिलेला हार अशा दोन वस्तू मंगळवारी पहाटे चोरीला घेल्याची घटना उघडकीस आली आहे.
चोरट्यांनी मंदिरचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करून या वस्तू लांबविलया आहेत. मंदिर प्रशासनाने याबाबतची तक्रार टिळकवाडी पोलिस स्थानकात नोंदविल्यानंतर पोलिसांनी येऊन श्वानपथक आणून चोरांचा माग घेण्याचा प्रयत्न केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बेळगावचे पोलीस तिकडे असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बंदोबस्तात व्यस्त असताना दुसरीकडे सुरीचे प्रमाण वाढत आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
शहरात सध्या मंत्र्यांची आमदारांची आणि व्हीआयपींची रेलचेल येजा सुरू आहे.
बेळगाव सह राज्यभरातील 5000 पोलीस बंदोबस्तासाठी बेळगाव दाखल झाले आहेत असे असताना बेळगाव पोलिसांनी स्थानिक रहिवासी क्षेत्रात देखील लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी या निमित्ताने होऊ लागली आहे.