बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर गावाजवळील सरकारी जागेवर सुसज्ज आंतरराष्ट्रीय स्टेडियम बांधण्यासाठी सरकार तयार असल्याचे अनुसूचित जमाती कल्याण, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा मंत्री बी. नागेंद्र यांनी सांगितले.
स्थानिक आमदारांनी यांनी बुधवारी विधानसभेच्या कामकाजादरम्यान येळ्ळूरच्या क्रीडांगणाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
त्याला उत्रर देताना मंत्री बी. नागेंद्र यांनी, केंद्र सरकारच्या अनुदानासह राज्य सरकारच्या अनुदानातून स्टेडियम बांधण्यासाठी कोणताही अडथळा नाही. येळ्ळूर गावातील सर्व्हे क्रमांक 1142 मधील 66 एकरपैकी 40 एकर जागा क्रीडा विभागाच्या ताब्यात दिली आहे.
पार्किंगसह सुसज्ज स्टेडियम बांधण्यासाठी किमान 55 एकर जागेची आवश्यकता आहे. जमीन हस्तांतरण प्रक्रियेसाठी जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली 11 अधिकार्यांची समिती
यापूर्वीच स्थापन करण्यात आली आहे.
स्थानिक आमदारांनी आवश्यक असलेली 15 एकर जागा उपलब्ध करून दिल्यास स्टेडियमच्या उभारणीचा आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असे सांगितले.
एकीकडे मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय स्टेडियम बांधण्या बाबत वक्तव्यं केले असेल तरी येळळूर ग्रामस्थांचा गावची गायरान जमीन देण्यास विरोध दर्शवलेला आहे.