बेळगांव लाईव्ह :स्वतः तुम्ही प्रकाश व्हा असे गौतम बुद्ध यांनी जगाला दिला. सारासार विवेकबुद्धीचा विचार जीवनात उतरवायला हवा.
*राष्ट्रवीर शामराव देसाईंनी बहुजन समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले. वेळोवेळी आपल्या लेखनातून समाजात क्रांतीकारी परिवर्तन घडवून आणले असे मत ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. भरत पाटणकर यांनी व्यक्त केले.
बेळगावातील ज्योती कॉलेज मध्ये राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार कष्टकऱ्यांचे नेते डॉ भारत पाटणकर यांना जेष्ठ इतिहास संशोधक मंजुश्री जयसिंगराव पवार यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी द. म.शि मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील होते.
धार्मिक गुलामगिरी, भांडवल शही, संयुक्तं महाराष्ट्र, चळवळ, गोवा मुक्ती चळवळ, सीमावाद आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणात तंत्रज्ञानाची जोड, कडाडून सावकरीला विरोध, वेळोवेळी लेखनातून समाजात क्रांतीकारी बदल घडवून आणण्यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी कार्य केले हेच विचार राष्ट्रवीर शामराव देसाईंनी केले बहुजन समाजाचे नेतृत्व पुढे घेऊन गेले आहेत. आज फोफावलेल्या मनुवाद निपटून काढण्यासाठी आज सत्यशोधक विचाराची गरज निर्माण झाली आहे. सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवित , पुनःर्जिवित करायला आहे. महात्मा जोतिबा फुले यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी समाजाने जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. भरत पाटणकर* यांनी पुरस्कार ला उत्तर देत असताना सांगितले.
व्यासपीठावर कोल्हापूर येथील इतिहास संशोधक विचारवंत साहित्यिका डॉ. मंजुश्री जयसिंगराव पवार, माजी प्राचार्य डॉ आनंद मेणसे, माजी प्राचार्य आनंद देसाई, संस्थेचे सचिव प्रा. विक्रम पाटील, सहसचिव डॉ. दिपक देसाई उपस्थित होते.
मराठी विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षिका नीला आपटे यांनी ईशस्तवन व स्वागगीत क्रांतिकारी गीत सादर केले. स्वागत व प्रास्ताविक व शामराव देसाई यांच्या जीवनकार्य यांच्या जीवनावर कोल्हापूर येथील विचारवंत मंजुश्री पवार यांनी मांडले. परिचय जी एस एस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ आनंद मेणसे यांनी करून दिला.
सुत्रसंचलन व आभार प्रा. एस. व्हि. पाटील यांनी यांनी मानले.