बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील सामर्थ्य व्यायाम मंदिरातर्फे आयोजित टॉप -10 शरीरसौष्ठव स्पर्धेच्या विजेतेपदासह ‘समर्थ श्री -2023’ हा किताब संकेत सुरूतेकर याने पटकावला आहे.
टिळकवाडी येथील सामर्थ्य व्यायाम मंदिरातर्फे आयोजित समर्थ श्री -2023 टॉप -10 शरीरसौष्ठव स्पर्धा काल रविवारी यशस्वीरित्या पार पडली.
सदर स्पर्धेमधील पहिल्या 10 क्रमांकाच्या विजेत्या शरीरसौष्ठवपटूंमध्ये अनुक्रमे संकेत सुरतेकर, सौरभ खांडेकर, गोपाळ सेनवी, श्रवण चतुर, रवी बेटगार, ओमकार बोकडे, मंगेश शिंदोळकर, भावेश ताशिलदार, अनुज चौगुले आणि अजय चौगुले यांचा समावेश आहे.
या सर्व यशस्वी शरीरसौष्ठवपटूंना स्पर्धेनंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात प्रशस्तीपत्रसह आकर्षक बक्षीस देण्यात आली. ‘समर्थ श्री’ किताब विजेत्या संकेत सुरूतेकर याला टायटलसह ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण पै यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक विनायक गुंजटकर ॲड. एस. बी. शेख, किरण कावळे, प्रवीण खर्डे, राम पाटील, प्रभाकर कुट्रे, राजू मरवे आदी उपस्थित होते.
या सर्वांचे समर्थ व्यायाम शाळेचे प्रशिक्षक राजकुमार बोकडे यांनी स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक गुंजेटकर यांनी व्यायाम शाळेला 2 हजार रुपयांची उत्स्फूर्त देणगी देऊ केली. बक्षीस समारंभाचे औचित्य साधून व्यासपीठावरील मान्यवरांसह समर्थ व्यायाम शाळेचे जुने व्यायामपटू राजू आजगांवकर, शिवाजी माने, सुनील बोकडे,
प्रवीण खर्डे, विनायक गुंजटकर, अमित हलगेकर, अभी देसुरकर, परशराम मेत्री, इरफान, प्रभाकर कुट्रे, सुनील राऊत व अजित चौगुले यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यायाम शाळेच्या व्यायामपटुंसह हितचिंतक आणि क्रीडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.