Saturday, January 11, 2025

/

अर्धवेळ व्याख्यात्यांचे ‘यासाठी’ सुरू आहे आंदोलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमधील अर्धवेळ व्याख्यात्यांना पगार वाढीसह नोकरीत कायम करावे, या मागणीसह अन्य विविध मागण्या अखिल कर्नाटक सरकारी पॉलिटेक्निक अर्धवेळ व्याख्याता संघटना तसेच अखिल कर्नाटक अभियांत्रिकी अर्धवेळ व्याख्याता हितरक्षण संघातर्फे शिक्षण मंत्र्यांसह महाविद्यालय व तांत्रिक शिक्षण खात्याच्या आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक सरकारी पॉलिटेक्निक अर्धवेळ व्याख्याता संघटना आणि तसेच अखिल कर्नाटक अभियांत्रिकी अर्धवेळ व्याख्याता हितरक्षण संघाने बेळगाव सुवर्ण विधानसौध आंदोलन स्थळी धरणे सत्याग्रह सुरू केला आहे.

सदर आंदोलनात राज्यातील 16 सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमधील स्त्री-पुरुष अर्धवेळ व्याख्यात्यांनी भाग घेतला आहे. हे सर्वजण हातात मागण्यांचे फलक धरून निदर्शने करत सरकारचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. जोपर्यंत शिक्षण मंत्री किंवा महाविद्यालय व तांत्रिक शिक्षण खात्याचे आयुक्त आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्या व्याख्यात्यांकडून व्यक्त होत आहे.

आंदोलनाप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना प्रीतमकुमार या अर्धवेळ प्राध्यापकाने सांगितले की, राज्यातील 16 सरकारी पॉलिटेक्निक व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अर्धवेळ व्याख्यात्यांचा आमच्या या आंदोलनात सहभाग आहे. गेल्या 2010 सालापासून एकाही अर्धवेळ व्याख्यात्यांची कायमस्वरूपी व्याख्याते म्हणून नियुक्ती झालेली नाही. मात्र तरीही तेंव्हापासून म्हणजे 2011 पासून आम्ही आमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. अर्धवेळ व्याख्याते म्हणून काम करणारे आम्ही 250 ते 300 जण आहोत. आमचा पगारही अतिशय कमी आहे. तुलना करायची झाल्यास कारागृहातील कैद्यांचा पगारही आमच्यापेक्षा जास्त असेल.Prot

महाविद्यालयातील सर्व काम करून देखील अत्यल्प पगार मिळत असल्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. त्यासाठीच महाविद्यालयाच्या कामावर बहिष्कार टाकून गेल्या 14 -15 दिवसापासून आम्ही हे आंदोलन करत आहोत. आम्हाला नोकरीत कायम करावे आणि पगार वाढ केली जावी ही आमची प्रमुख मागणी आहे असे सांगून राज्यातील आम्ही राज्यातील 16 सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजचे हंगामी व्याख्याते या ठिकाणी आंदोलन करत आहोत, अशी माहिती प्रीतमकुमार यांनी दिली.

गेल्या 14 दिवसांपासून आम्ही आमच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी आंदोलन करत आहोत. अद्यापपर्यंत आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असले तरी जोपर्यंत शिक्षण मंत्री इथे येऊन आमची भेट घेत नाही तोपर्यंत यांचे आंदोलन सुरूच राहील, असे योगेश चवळी हा अन्य एक अर्थवेळ व्याख्याता यावेळी बोलताना म्हणाला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.