Wednesday, January 22, 2025

/

महापौरांची पाणी टंचाई नियोजन बैठक

 belgaum

बेळगाव लाईव्ह: यंदा पाऊस कमी झाल्याने आगामी एप्रिल मे महिन्यात बेळगाव शहराला पाणीटंचाई भासू नये यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यासाठी बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे यांनी उपमहापौर आणि नगरसेवकांची बैठक घेतली.

प्रामुख्याने या बैठकीत पाणी टंचाई होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून अँक्शन प्लॅन बनवणार असून शहरातील जलस्त्रोत शोधून पाण्याची नासाडी होऊ नये यासाठी मनपा यंत्रणेने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शहरातील सर्व पाणी गळत्या त्वरित बंद कराव्यात यासाठी उपाय योजना करा असे सांगत अधिकाऱ्यांना सूचना करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.बेळगाव शहरातील जलस्त्रोत्राना प्रत्यक्ष भेटी देऊन मनपा यंत्रणा सतर्क करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

हिंडलगा केंबाळी नाल्यावर समस्या सोडवून शहरातील पाणी कसे वाचवता येईल यावर भर देण्याचा सूचना देखील महापौरांनी केल्या. यावेळी नगरसेवकांनी बैठकीत पाणी समस्येवर कसे नियंत्रण आणता येईल यावर चर्चा केली.Water problem meeting

27 रोजी महापालिकेची सर्वसाधारण बैठक

बेळगाव महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक उद्या बुधवार दि 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे बैठकीच्या विषय पत्रिकेवर सहा विषय घेण्यात आले असून त्या व्यतिरिक्त महापौरांच्या परवानगीने इतर विषयांवर चर्चा होणार आहे.

बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीची तारीख यापूर्वी 26 डिसेंबर ही ठरविण्यात आली होती. मात्र त्यात बदल करून आता बैठक 27 डिसेंबर रोजी घेण्याचे ठरले आहे. सदर बैठकीत सर्वप्रथम 29 नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण बैठकीच्या इतिवृत्तावर चर्चा करण्यात येणार आहे. अर्थ स्थायी समितीच्या तीन बैठकांचे इतिवृत्त या सर्वसाधारण बैठकीत मंजुरीसाठी घेण्यात आले आहे. कारण गेल्या 25 व 30 सप्टेंबरसह 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या अर्थ स्थायी समितीच्या बैठकांचे इतिवृत्त सर्वसाधारण बैठकीत मंजुरीसाठी आले नव्हते. घरपट्टी वाढविण्याचा निर्णय वादग्रस्त ठरल्याने सर्व स्थायी समितीच्या बैठकींचे इतिवृत्त मंजुरी विना ठेवण्यात आले होते.

तथापि आता 27 रोजीच्या बैठकीत एकाच वेळी तीन बैठकांच्या इतिवृत्तावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. याव्यतिरिक्त बांधकाम स्थायी समितीच्या 6 व 24 नोव्हेंबर रोजीच्या बैठकीचे इतिवृत्तही अद्याप मंजूर झालेले नसून ते देखील येत्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.