बेळगाव लाईव्ह :कायदा सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीला चांगला प्रतिसाद लाभला. दिवसभरात तब्बल २१९०९ खटले निकालात काढले असून कोट्यवधींची देव-घेव झाली.
दर सहा महिन्यांनी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. या अदालतीसाठी कायदा सेवा प्राधिकरणाकडून जागृती करण्यात आली होती. शनिवारी सकाळी १०.३० वाजता लोकअदालतीला सुरूवात झाली. प्रत्येक न्यायालयात या अदालतीचे आयोजन करण्यात आले.
आले असून कोट्यवधी रूपयांची देवघेव करण्यात आली आहे. आजच्या लोकअदालतीत १६९६ फौजदारी स्वरूपाचे खटले निकालात होते. संध्याकाळी मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात २१ हजार ९०९ खटले निकालात काढण्यात आले. परस्पर संमतीने हे खटले निकालात काढण्यात आले.
अठरा जोडपी पुन्हा एकत्र
कौटुंबिक कारणांनी वाद विकोपास गेलेल्या अठरा जोडप्यांतील वाद मिटवण्यास न्यायालयाला यश आले. परस्पर संमतीने वाद मिटवण्यात आले. कौंटुबिक न्यायालयात ही १८ मने पुन्हा जुळवण्यात आली. वादाचे कारण शोधून ते दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जोडप्यांचे समुपदेशन करण्यात आले.
याशिवाय बँक, आर्थिक फसवणूक, धनादेश न वटणे, कौटुंबिक वाद, जमिनीचे वाद आदी खटल्यांवर सुनावणी करण्यात आली. या लोकअदालतीतून लोकांना वेळ, पैसा वाचवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्यानुसार लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. न्यायालयत आवारात दिवसभर गर्दी दिसून आली. सुरूवातीला एकाच इमारतीत लोकअदालत चालत होती. पण, आता सर्व न्यायालयांत लोकअदालत चालत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.