Monday, December 30, 2024

/

चौपट दंड टाळण्यासाठी झटपट करा पिक-अप, ड्रॉप-ऑफ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ साठी वाहनांनी विमानतळाच्या टर्मिनल इमारती समोर थांबण्याचा कालावधी 3 मिनिटे इतका असून या कालावधी पेक्षा जास्त वेळ थांबल्यास पार्किंग शुल्काच्या चौपट दंड (140 रु.) आकारला जातो, असे स्पष्टीकरण बेळगाव विमानतळाच्या संचालकांनी एका प्रवाशाच्या तक्रार वजा पत्राला उत्तर देताना दिले आहे.

विमानतळाच्या ठिकाणांचा प्रवेश संग्रह किंवा कंत्राटदाराने लागू केलेले पार्किंग शुल्क या संदर्भात स्पष्टीकरण देण्याची विनंती एका प्रवाशाने बेळगाव विमानतळाच्या संचालकांना पत्राद्वारे केली आहे. अन्य एकाने पार्किंग शुल्क आकारणीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सध्याचा कंत्राटदार शुल्क मोजणीसाठी थोडाही वाढीव कालावधी उपलब्ध करून न देता ड्रॉप-ऑफ आणि पिक-अप वाहनांकडून शुल्क आकारत आहे. तेंव्हा आपल्या कार्यालयाकडून पार्किंगसंदर्भात विमानतळ प्रशासन आणि कंत्राटदारामध्ये झालेला कराराची माहिती नियम, अटी, कालावधी व शुल्काच्या स्वरूपासह तपशीलवार उपलब्ध केल्यास जनतेला आनंद होईल, अशा आशयाचा तपशील विमानतळ संचालकांच्या नावे असलेल्या पत्रात नमूद आहे. याबरोबरच पार्किंग सुविधेची गरज नसलेल्या म्हणजे फक्त प्रवाशांना पटकन सोडणाऱ्या आणि घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी एखादा दुसरा मार्ग किंवा पर्यायाची माहिती दिल्यास बरे होईल, असेही संबंधित प्रवाशाच्या पत्रात नमूद आहे.

सदर पत्राची दखल घेत बेळगाव विमानतळाच्या संचालकांनी प्रत्युत्तर दिले आहे. विमानतळावर रहदारीची कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) बाहेरील एजन्सीशी बेळगाव विमानतळाच्या ठिकाणच्या कार पार्किंग व लेन व्यवस्थापना संदर्भात महसूल करार केला आहे. त्यानुसार पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ साठी वाहनांनी विमानतळाच्या टर्मिनल इमारती समोर थांबण्याचा कालावधी 3 मिनिटे इतका आहे. तथापि या निर्धारित कालावधी पेक्षा जास्त वेळ थांबल्यास पार्किंग शुल्काच्या (140 रु.) चौपट दंड आकारला जातो. टर्मिनल इमारती समोर या पद्धतीने निर्धारित कालावधी पेक्षा अधिक काळ थांबणाऱ्या वाहनांकडून कार पार्किंग व लेन व्यवस्थापन एजन्सीला दंड वसूल करण्याचा आणि तो एएआयकडे जमा करण्याचा अधिकार आहे. नियुक्त कार पार्किंगचा उपयोग करणाऱ्या वाहनांना पार्किंग शुल्क लागू असेल. कार पार्किंगचे शुल्क (अनुक्रमे वाहनाचा प्रकार, 0 ते 30 मिनिट, 30 मिनिट ते 2 तास यानुसार) पुढील प्रमाणे आहे. दुचाकी वाहन -10 रु., 15 रुपये. कार -20 रु., 35 रुपये. टेम्पो /एसयुव्ही /मिनीबस -20 रु., 35 रुपये. कोच /बस /ट्रक -20 रु., 50 रुपये. पार्किंग केलेल्या वाहनांसाठी एजन्सीकडून वाहन क्रमांक, वेळ आणि लागू केलेल्या शुल्काचे पार्किंग टोकन अदा केले जाईल. उपरोक्त पार्किंग दरांना एएआयची मंजुरी मिळाली आहे.Airport

तुम्ही नमूद केल्याप्रमाणे दुसऱ्या पर्यायी मार्गाची गरज नाही. प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी येणारी वाहने निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ न थांबता नेहमीच्या मार्गाने थेट टर्मिनल इमारतीपर्यंत येऊ शकतात. विमानतळ आवारातील प्रवेशाच्या ठिकाणी दिले जाणारे टोकन हे टर्मिनल इमारती समोर तीन मिनिट थांबण्याच्या वेळेसाठी दिले जाते. पार्किंग शुल्क मात्र नियुक्त पार्किंग जागेमध्येच जमा केले जाते, असे स्पष्टीकरण बेळगाव विमानतळाच्या संचालकांनी संबंधित प्रवाशाच्या पत्राला उत्तर देताना दिले आहे. दरम्यान टर्मिनल इमारती समोर ड्रॉप-ऑफ आणि पिक-अपसाठी थांबण्याच्या अवघ्या 3 मिनिटाच्या वेळेबद्दल अनेकांनी नापसंती प्रकट केली आहे.

याबाबतीत गोवा विमानतळाची भूमिका स्पष्ट आहे, त्या ठिकाणी वाहनांना प्रवेश करून बाहेर पडण्यासाठी 3 मिनिटाच्या थांबण्याच्या वेळेसह एकूण 10 मिनिटांचा कालावधी दिला जातो जो योग्य आहे. तथापि गोव्याचे विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे त्या ठिकाणी दररोज अनेक विमानांची ये-जा सुरू असते हे लक्षात घेतले पाहिजे, असे मत एका प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

 belgaum

1 COMMENT

  1. Corruption at Airport Parking is rampant. The entry of vehicles is recorded but not the exit. The contractor invariably demand charges, be it within 10 minutes or 30 minutes or 2 hrs. but he doesn’t pass any receipts after taking money. Hence the amount received by agents is not recorded. Only when demand for receipts lead to arguments receipt is given. Why it is going un noticed by authorities?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.