बेळगाव लाईव्ह :कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्सच्या सहकार्याने मायास् फ्रेंड्स ग्रुप अँड जीएसएन दावणगिरी यांच्यावतीने दावणगिरी जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेने आयोजित केलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील मानाचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स ‘मि. कर्नाटक सीरी -2023’ हा किताब दावणगिरीच्या मंजुनाथ एस. याने पटकाविला आहे.
दावणगिरी येथील मोती वीराप्पा कॉलेज मैदानावर काल रविवारी सायंकाळी सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. सदर स्पर्धेत बेळगावच्या शरीर सौष्ठवपटूंनी देखील चमकदार कामगिरी नोंदविली. इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन मुंबईच्या मान्यतेने विविध 8 वजनी गटात पार पडलेल्या या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचा गटवार अंतिम निकाल (अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते) पुढीलप्रमाणे आहे.
55 किलो गट : रोहित माळवी बेळगाव ,शशी धारवाड, मोनिश एम. दावणगिरी, हेमंतकुमार मडिवाळ कारवार, गोविंद यादव उडपी. 60 किलो गट : अफ्तार किल्लेदार बेळगाव, मदन जी. के. धारवाड, चंद्रशेखर दावणगिरी, दर्शन जी. चित्रदुर्ग, दादा खलंदर कारवार. 65 किलो गट : रमेश अंबिगर धारवाड, मंजुनाथ बळीगेर चित्रदुर्ग, सोमशेखर खारवी उडपी, संतोष नाईक शिमोगा, मंजुनाथ सोनटक्की बेळगाव.
70 किलो गट : विघ्नेश उडपी, दिनेश आचार्य मंगळूर, सत्यानंद भट म्हैसूर, विनय डोणकरी बेळगाव, केदार पाटील बेळगाव. 75 किलो गट : प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, तपसकुमार नायक चित्रदुर्ग, नागेंद्र मडिवाळ बेळगाव, युसुफ आय. बी. दावणगिरी, सुनील भातकांडे बेळगाव. 80 किलो गट : धनराज मंगळूर, वरूणकुमार जी. दावणगिरी, रवीकुमार एस. बेंगलोर, क्विंटन मंगळूर, अफ्रोज ताशिलदार बेळगाव.
85 किलो गट : प्रशांत खन्नूकर बेळगाव, विजय पी. धारवाड, प्रसाद बाचीकर बेळगाव, विशाल चव्हाण बेळगाव, जहार सिंग उडपी. 85 किलो वरील गट : मंजुनाथ एस. दावणगिरी, गौतम उडपी, सत्यनारायण आर. टी. दावणगिरी, एम. डी. झाकीर बेळगाव, सुजित शिंदे बेळगाव. मेन्स फिजिक : क्विंटन मंगळूर, मंजुनाथ दावणगिरी, सत्यानंद भट म्हैसूर, गौतम एस. एम. बेंगलोर, दादा खलंदर कारवार.
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स : मंजुनाथ एस. (दावणगिरी). बेस्ट पोझर : दर्शन जी. (चित्रदुर्ग). सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रीय पंच नीलकंठ, कार्यकारी अध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, खजिनदार दिलीपकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दावणगिरी जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.