Wednesday, January 22, 2025

/

अथणी नको चिकोडी जिल्हा करा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडी जिल्ह्याची घोषणा करण्याच्या मागणीसाठी आज चिकोडी शहरात भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी अथणी जिल्ह्याची मागणी योग्य नसून पूर्वीपासून मागणी असलेल्या चिकोडी जिल्हा निर्मिती करावी अशी मागणी करण्यात आली.

चिकोडी शहरातील बस स्थानकापासून चिकोडी चिकोडी श्री संपादना स्वामीजींच्या नेतृत्वाखाली जिल्हा आंदोलन समिती, वकील संघटनेसह विविध संघटना व नागरिकांनी भव्य मोर्चा काढला. बस स्थानकापासून के.सी.रस्ता, नगरपरिषद चौक, गुरुवार पेठ, कृष्णा सर्कलमार्गे बसव सर्कलपर्यंत मोर्चा काढण्यात आला.
या ठिकाणी कांही वेळ मानवी साखळी करून निदर्शने करण्यात आली. त्यानंतर चिकोडी प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांच्याकडे सरकारला जिल्हा निर्मितीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना चिकोडी संपादना स्वामीजी म्हणाले मागील 30 वर्षांपासून चिकोडी जिल्हा निर्मितीची मागणी होत आहे. पण अचानक अथणी जिल्हा करण्याची मागणी करणे चुकीचे आहे. चिकोडी शहरात सर्व जिल्हास्तरीय कार्यालये व सुविधा असून चिकोडी जिल्ह्याची निर्मिती रास्त आहे. सर्व लोकप्रतिनिधीनी चिकोडी जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करावे असे सांगितले.
जिल्हा आंदोलन समितीचे सचिव चंद्रकांत हुक्केरी म्हणाले यापूर्वी आश्वासन दिलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चिकोडी जिल्ह्याची घोषणा करावी. तसेच लोकप्रतिनिधीनी मौन न बाळगता चिकोडी जिल्हा मागणीसाठी सरकारवर दबाव टाकावा. अथणी जिल्हयाची मागणी करण्याबागे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगितले.Chikodi

यावेळी नगराध्यक्ष ऍड प्रवीण कांबळे, ऍड एस वाय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी चिकोडी जिल्हा आंदोलन समितीचे अध्यक्ष संजू बडीगेर, नागेश माळी, नागराज मेदार, संतोष टवळे, विश्वनाथ कामगौडा, तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, ऍड सतीश अप्पाजीगोळ यांच्यासह विविध संघटनेचे सदस्य, नगरसेवक, शाळा महाविद्यालय विद्यार्थी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

अन्यथा सुवर्ण सौधसमोर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करू
यावेळी युवा नेते श्रीनाथ घट्टी बोलताना म्हणाले चिकोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी अनेक वर्षे आंदोलन सुरू आहे. राजकीय नेते केवळ आश्वासन देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी चिकोडी जिल्हा जाहीर करावा अन्यथा बेळगाव सुवर्णसौध अधिवेशनात पाच जण पेट्रोल ओतून पेटवून घेऊ असा इशारा दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.