बेळगाव लाईव्ह – 117 वर्षे पूर्ण केलेल्या येथील दि पायोनियर अर्बन बँकेला उत्कृष्ट बँकेचा पुरस्कार मंगळवारी एका समारंभात बहाल करण्यात आला.
बेळगाव जिल्हा अर्बन सौहार्द सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सभा मंगळवारी मराठा सहकारी बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष बाळाणणा कगगनगी हे होते. जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये पाच विभाग करून त्यातील 100 ते 150 कोटीच्या ठेवी असलेल्या बँकेमध्ये पायोनियर बँकेला सर्वोत्कृष्ट बँक म्हणून गौरविण्यात आले.
बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी इतर सर्व संचालकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्विकारला .
अगदी अल्पावधीत पायोनियर बँक ठेवींमध्ये 68 कोटीवरून 140 कोटीपर्यंतची भरीव वाढ पायोनियर बँकेने केली असून आत्ताच रिझर्व बँकेकडून आणखीन तीन शाखा काढण्यासाठी परवानगी आली आहे.
आतापर्यंत बँकेच्या 4 शाखा असून या नवीन तीन शाखांमुळे बँकेच्या सात शाखा होणार आहेत. यापुढेही बँक अधिकाधिक प्रगती करेल असा विश्वास चेअरमन श्री अष्टेकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी बँकेचे संचालक अनंत लाड, गजानन पाटील ,विद्याधर कुरणे ,गजानन ठोकणेकर, सौ सुवर्णा शहापूरकर, सीईओ अनिता मूल्या आदी उपस्थित होते