Thursday, November 28, 2024

/

यमुनापूरच्या वाल्मीकी समाज स्मशानभूमी बाबत निवेदन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :यमुनापूर गावाच्या व्याप्तीतील फार पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीच्या ठिकाणीच आम्हाला कायमस्वरूपी अंत्यसंस्कार करण्यास अनुमती देण्याबरोबरच तशी सरकारी कागदोपत्री नोंद तहसीलदार कार्यालयामध्ये केली जावी, अशी मागणी यमनापूरच्या वाल्मिकी समाजातर्फे श्री राजा वीर मदूकरी नायक युवक संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

यमनापूर येथील श्री राजा वीर मदूकरी नायक युवक संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपरोक्त मागणीची निवेदन आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यमुनापूर गावाजवळ वाल्मिकी समाजाची स्मशानभूमी फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. मात्र हिंडाल्को फॅक्टरीसाठी अतिरिक्त जागा हवी असल्यामुळे 2013 -14 साली सदर स्मशान भूमीच्या जागेच्या बदल्यात काकती जवळ स्मशानासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.Yamnapur

मात्र ही जागा दूरवर पडत असल्यामुळे यमुनापूर गावातील वाल्मिकी समाजाची मोठी गैरसोय होत आहे. समाजातील एखाद्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी काकतीपर्यंत जाण्याकरिता नागरिकांना विशेष करून वृद्ध व्यक्ती आणि महिलांना बराच त्रास -मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून यमुनापूर गावातील वाल्मिकी समाजाला गावानजीक असलेल्या पूर्वीच्याच स्मशान भूमीमध्ये कायमस्वरूपी अंत्यसंस्कार करण्याची अनुमती दिली जावी.

त्याचप्रमाणे तशी नोंद तहसीलदार कार्यालयातील सरकारी कागदपत्रात केली जावी, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी श्री राजा वीर मदूकरी नायक युवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह यमनापूर येथील वाल्मिकी समाज बांधव उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.