Thursday, December 19, 2024

/

विधिमंडळ अधिवेशनाची घोषणा मंगळवारी होणार

 belgaum

बेळगाव लाईव्ह ;डिसेंबर महिन्यात नियोजित विधिमंडळ अधिवेशनाची घोषणा मंगळवारी करण्यात येणार आहे.

विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती मंगळवारी हलगा येथील सुवर्णसौधची पाहणी करून अधिवेशना बाबत घोषणा करणार आहेत.

चार डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान बेळगावात विधिमंडळ अधिवेशन होण्याची शक्यता आहे. तशा सूचना राज्य सरकारने केल्या असल्यामुळे जिल्हा प्रशासन पूर्वतयारीला लागले आहे.

आता विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर आणि विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी हे मंगळवारी सकाळी सुवर्णसंधीची पाहणी करणार आहेत.

त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विधिमंडळ अधिवेशनाबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.