बेळगाव लाईव्ह : ओली पार्टी करणे पोलिसांना अंगलट आले आहे कारण हायवे पेट्रोलिंगच्या सरकारी वाहनात पोलिस कर्मचारी ऑन ड्युटी दारू व मटण पार्टी करीत असल्याची घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी दोन पोलिसांनी निलंबित केल्याचा आदेश एसपी भीमाशंकर गुळेद यांनी दिला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की चिकोडी पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी 112 या गस्त घालत असताना ओली पार्टी करीत होते. विलास धुमाळे व संतोष कमते अशी पोलिसांची नावे आहेत .
गस्त घालत असताना चिकोडी तालुक्यातील नागराळ गावच्या बाहेर रात्री 9 च्या दरम्यान गाडी क्रमांक केए 22 जी 1818 क्रमांकाची पोलीस पेट्रोलिंग गाडी थांबवून जमिनीवर बसून दारू व मटणाचे सेवन करून पार्टी करीत होते.
ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी पार्टी करीत असल्याचा व्हिडीओ प्रसारित झाला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यानी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचा आदेश दिला आहे.
112 आपत्कालीन क्रमांक योजनेचा उद्देश बाजूला : भांडण, तंटे, अपघात किंवा पोलिसांकडून मदतीची गरज असताना नागरिकांना संपर्क साधावा यासाठी राज्यात पोलीस खात्याने 112 हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे.
यासाठी विशेष 112 गस्त वाहने सुरू केली आहेत. 112 क्रमांकावर फोन केल्यास सदर वाहनातून पोलिस नागरिकांच्या मदतीला धावतात. ही सेवा 24 तास असून संकटकाळी मदतीला धावून जाणाऱ्या पोलिसांनीच जर अशाप्रकारे दारूच्या पार्ट्या करीत आहेत. दारूच्या नशेत लोकांची मदत कशी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.