Friday, October 18, 2024

/

बेळगावच्या तनिष्काचा ट्रिपल धमाका!

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव म्हणजे क्रीडा पटूचीं खाण, क्रिकेट,हॉकी, कुस्ती ज्युडो बॉडी बिल्डिंग आदी खेळात बेळगावातील खेळाडूंनी राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीयपातळीवर चमक दाखवली आहे त्यातीलचं एक अग्निशिखा म्हणजे तनिष्का!बेळगावच्या अनेक लेकी आहेत ज्यांनी आपल्या गावाचे नाव वेगवेगळ्या क्षेत्रात उज्वल केले आहे. टेबल टेनिस या खेळात टिळकवाडी येथे राहणाऱ्या तनिष्का हिने अनेक पदके मिळवत यश संपादन केले आहे.

कर्नाटक राज्यात पहिल्यांदाच एकाच खेळाडूने तिन्ही वयोगटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. बंगळुरु येथे झालेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 13 वर्षाखालील 15 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील वयोगटात राज्य स्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले आहे.

तनिष्का हिने काल बंगळुरुत झालेल्या स्पर्धेत 13 वर्षाखालील अंतिम सामन्यात अनते मारियाना हिचा 11-0, 11-9,11-2 अश्या फरकानी तर 15 वर्षा खालील गटात बेळगावच्याआयुषी गोडसे हिचा 11-6, 9-11 आणि 11-7 अश्या फरकानी पराभव केला या शिवाय 17 वर्षा खालील वयो गटात तनिष्का हिने हिया सिंह हिचा 11-6 ,11-5 आणि 11- 3 असा पराभव करत तीन गोल्ड मेडल जिंकली आहेतTanishka

कर्नाटक टेबल टेनिस असोसीएशन आयोजित राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत तिन्ही गटात सुवर्ण पदक मिळवत इतिहास घडवला आहे.कर्नाटक राज्याच्या टेबल टेनिस इतिहासात पहिल्यांदाच एकाच खेळाडूंने तिन्ही गटात गोल्ड मेडल मिळवले आहे.

मागील काही महिन्यापूर्वी तनिष्का हिने बँकॉक येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत सहभाग दर्शवला होता त्यावेळी मायदेशी परतल्या वर शाळेने तिची मिरवणूक काढत प्रोत्साहन दिले होते.
बेळगावचे टेबल टेनिस प्रशिक्षक संगम बेलूर यांच्या मार्गदर्शना तिने हे यश मिळवले आहे.

तनिष्का ही बेळगावची होतकरू टेबल टेनिस खेळाडू असून या अगोदर तिने अनेक स्पर्धांतून यश मिळवले आहे. पाच राष्ट्रीय स्पर्धांतून मेडल मिळवले आहे त्यात एक सुवर्ण दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई तिने केली आहे.

अनेक स्पर्धांतून सहभाग सोनाली काळभैरव आईंचा मार्गदर्शन सोबत लाभते. सगळ्या स्पर्धांतून आई सोबत जात असते. डी पी शाळेत सहावीत शिकते शाळेचे देखील तिला सहकार्य मिळत आहे.
कोविड काळात ज्यावेळी अनेकांनी विश्रांती घेणे पसंद केले त्यावेळी तनिष्का हिने वेळेचा सदुपयोग करत ट्रेनिंग कोचिंग घेतल्याने त्याचा फायदा आज होत असल्याचे मत कपिल काळभैरव यांनी सांगितले. तनिष्काचे हे नेत्रदीपक यश बेळगाव कराना अभिमानास्पद आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.