Sunday, November 17, 2024

/

सह्यगिरी ट्रेकर्सने सर केले कळसुबाई शिखरावर*

 belgaum

बेळगाव लाईव्ह:कंग्राळी खुर्द गावातील शिवभक्त धारकरी यांनीमहाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखला जाणार कळसुबाई शिखर सर केलं आहे.

कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६९० मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे.

या साहसा बाबत बेळगाव लाईव्हशी बोलताना प्रशांत पाटील यांनी सांगितले की यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकर्‍यांनी पायर्‍यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे.

शिखरावर कळसूबाईचे छोटे मंदिर आहे. देवळात साधारण ३ माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे. येथून समोरच खाली भंडारदयाचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.Kalasubai treckars

अलंग-मदन-कुलंग  हे इगतपुरी विभागातील सर्वात कठीण असे तीन किल्ले आहेत. हे किल्ले सर करण्यासाठी प्रस्तरारोण तंत्राची व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे. घोटीवरून भंडारदर्‍याला जातांना कळसूबाई शिख्रराच्या रांगेत अलंग, मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे हा परिसरातील भटकंती तशी कस पहाणारी आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा ,भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे असेही पाटील यांनी सांगितले.

या मोहिमेत. संतोष पाटील महादेव गौंडाडकर
शुभम गौंडाडकर आदर्श गौंडाडकर विजय पवार
जतीन काकतीकर हर्षद मोहिते श्री चौगुले शिव चव्हाण निखिल पाटीलओमकार गुरव विशाल पाटील उदय पाटील विवेक पाटील हे सामील आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.