बेळगाव लाईव्ह :बी.एस.येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजेंद्र यांची कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षातील मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले होते.
रमेश जारकीहोळी यांच्यासह बसन गौडा पाटील यत्नाल नाराज झाले होते त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती मात्र गुरुवारी रमेश जारकीहोळी यांनी घेतली विजयेंद्र यांची भेट घेतली आहे त्यामुळे जारकीहोळी यांची नाराजी दूर झाली का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
गेल्या आठवड्यात विजेंद्र यांच्या प्रदेशाध्यक्षपद निवडीवरून बसवराज पाटील यतनाळ आणि रमेश जारकीहोळी नाराज होते त्यांनी तश्या प्रकारची जाहीर वक्तव्ये देखील झाली होती.
या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी रमेश जारकीहोळी यांनी विजयेंद्र यांची भेट घेऊन त्यांना प्रदेशाध्यक्षपदी निवडीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी रमेश जारकीहोळी म्हणाले,लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. पुन्हा एकदा केंद्रात भाजपचे सरकार आणायचे आहे.नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर पुन्हा एकदा विराजमान करावयाचे आहे. त्यामुळे सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे.विजेंद्र यांची आज भेट घेतली. त्यांनीही राज्यात सर्वांच्या सहकार्याने पक्षाला पुढे नेण्याचे ठरविले आहे. असेही जारकीहोळी यांनी सांगितले.
एकूणच विजयेंद्र यांच्या निवडी नंतर नाराज असलेले रमेश जारकीहोळी यांनी भेट घेतल्याने बेळगावातील नाराजी कशी दूर होणार का? याबाबत देखील चर्चा रंगली आहे.