बेळगाव लाईव्ह :बेळगावातील हिंडालको जवळ रस्त्याशेजारी 12 फुटाचा अजगरला पकडुन जीवनदान देण्यात आले आहे.
बेळगांवतील इंडाल (हिंडाल्को)इंडस्ट्रीज परिसरात बुधवारी रात्री आठच्या दरम्यान रस्त्यावरून अजगर फिरत असताना तेथील नागरिकांच्या नजरेस आला होता
त्यावेळी भयभीत झालेल्या नागरिकांनी सर्पमित्र जोतिबा कंग्राळकर यांना संपर्क साधला.जोतिबा यांचे सहकार्यमित्र रोहित पाटील,सौरभ सावंत यांच्या मदतीने अजगर पकडुन जीवनदान दिले आहे.
बेळगावात सापडलेला अजगर 12 फुट इतका लांब असून यांचे वजन 30 ते 35 किलो इतका होते.
सामाजिक कार्यकर्ते विनायक केसरकर यांनी वन विभागातील अधिकारी संजय गस्ती,आनंद गौड, संपर्क साधून त्याच्या हाती पकडण्यात आलेल्या अजगरला देण्यात आले.
यावेळी जोतिबा कंग्राळकर यांनी याआधी धामीन, कोब्रा,राठीला,बोनस,वायफर, कॉमन, क्रेट,किलबॅक,उलप,अशा अनेक जातीच्या सापांना पकडून जीवदान दिले आहेत त्यांनी अजगर सापाला देखील जीवनदान दिले आहे.