बेळगाव लाईव्ह :धावत्या ट्रेनमधून पडल्याने झालेल्या अपघातात खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथील एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सदर घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भांदूर गल्ली रेल्वे मार्गाजवळ घडली.यल्लाप्पा संभाजी चोपडे वय 52 भूतनाथ गल्ली इदलहोंड असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव असून त्याला उजवा पाय गमवावा लागणार आहे. रेल्वेतून पडल्याने अपघातात त्याचा उजवा पाय गुडघ्या खालून कापला गेला आहे.
घटना घडताच रेल्वे पोलिसांनी आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमचे संतोष दरेकर आणि अवधूत तुडवेकर यांच्या सहाय्याने जखमीला बिम्स रुग्णालयात केले आहे.
या प्रकरणी अपघात कसा झाला याचा तपास रेल्वे पोलिस (जीआरपी) करत असून रुग्णाच्या कुटुंबीयांनाही याची माहिती देण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमला एक आपत्कालीन कॉल आला आणि घटनास्थळी पोहोचली. संतोष दरेकर आणि अवधूत तुडवेकर हे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत करून सदर जखमीला इस्पितळात दाखल केले.
जखमेच्या नातेवाईकांना अपघाताची कल्पना देण्यात आली असून एएसआय रुद्रप्पा धुली आणि पीसी शिवानंद शिदनाळ यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमच्या मदतीने रुग्णाला 108 रुग्णवाहिकेतून बिम्स इस्पितळात दाखल केले. अतिरक्तस्रावामुळे जखमी बेशुद्धावस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.