Monday, December 30, 2024

/

बेळगुंदीतील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेले कलमेश्वर गल्ली, बेळगुंदी येथील रहिवासी गिल्बर्ट बस्तू डायस (वय 53) यांचा मृतदेह गावातील मारिया भवन नर्सरी स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या उसाच्या शेतातील खुल्या विहिरीत आढळून आला आहे.

गिल्बर्ट डायस हे गेल्या सोमवारी दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान घरातून बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी सर्वत्र चौकशी व शोधाशोध करूनही ते न सापडल्यामुळे जॅकी डायस यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलकडे (एफएफसी) मदत मागितली होती.

त्यानुसार एफएफसीचे संतोष दरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वत्र शोध मोहीम सुरू केली होती. बेळगुंदी परिसरातील शेतांमध्ये, शेतांमधील विहिरी, रेल्वे स्टेशन, बस थांबे, प्रार्थना स्थळे वगैरे सर्व ठिकाणी गिल्बर्ट यांचा शोध घेऊनही कालपर्यंत त्यांचा थांगपत्ता लागू शकला नव्हता.

मात्र आज गुरुवारी सकाळी पुन्हा नव्या दमाने एफएफसीच्या कार्यकर्त्यांनी शोध मोहीम हाती घेतली असता बेळगुंदी येथील मारिया भवन नर्सरी स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या उसाच्या शेतातील खुल्या विहिरीनजीक प्रथम एक स्लीपरचा जोड आढळून आला. त्यावरून एफएफसीचे प्रमुख संतोष दरेकर यांना त्या विहिरीत मृतदेह असल्याची खात्री झाली. सदरची माहिती पोलिस आणि अग्निशामक दलाला देण्यात आली.Goilbo

तेंव्हा बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आदित्य राजन हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी त्यांनी आपल्या सोबत पोलीस श्वानपथकही आणले होते. दरम्यान अग्निशामक दलाचे अधिकारी नरेंद्र हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले.

त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी 70 फूट खोल विहिरीच्या तळाशी चिखलाच्या गाळामध्ये रुतून पडलेला गिल्बर्ट डायस यांचा मृतदेह महत्प्रयासाने बाहेर काढला. यावेळी तळाशी मृतदेह नेमका कोठे आहे? हे शोधण्यासाठी विहिरीतील पाण्यात वॉटर कॅमेरे सोडण्यात आले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.