बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशन विरोधात दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा भरवणार याशिवाय शहरातील चौकातून निदर्शन करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मंगळवारी रंगुबाई पॅलेस येथे शहर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस आयुक्तांनी अद्याप महामेळावा किंवा निदर्शने करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अर्ज परवानगी साठी आला नसल्याचे म्हटले हे चुकीचे असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पोलिसांना परवानगी साठी पत्र देण्यात आले आहे असे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले.
कर्नाटक सरकार बेळगाव वर आपला हक्क सांगण्यासाठी हिवाळी अधिवेशन बेळगावात भरवते त्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा आयोजित करून महाराष्ट्रात सामील होण्याच्या भावना व्यक्त करत असते आणि कर्नाटकी अधिवेशनाला प्रत्त्युत्तर देत असते त्या प्रमाणे यावेळी वॅक्सिन डेपो मैदानावर महा मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे किंवा शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज उद्यान, धर्मवीर संभाजी महाराज चौक, बसवेश्वर चौक हुतात्मा चौकात निदर्शने करण्यासाठी देखील परवानगी मागितली असल्याचे स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांची मागणी झाली पूर्ण
गेल्या अनेक वर्षापासून होत असलेल्या कार्यकर्त्यांच्या मागणीला यश मिळाले असून शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनरचना केली जाणार आहे मंगळवारी झालेल्या बैठकीत शहर समितीच्या पुनर्रचनेबाबत वादळी चर्चा झाली त्यानंतर शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनर्रचना करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मागील बैठकीत जाहीर केलेल्या अडीचशे कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकीत पुनर्रचना होणार आहे. महा मेळाव्य नंतर त्या 250 कार्यकर्त्यांची बैठक होणार असून त्या बैठकीत शहराची नवीन कार्यकारिणी निवडली जाणार आहे.
शहर समितीचे युवा नेते,कार्यकारिणी सदस्य मदन बामणे आदींना बैठक घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मध्यवर्ती सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्या कडून यादी घेऊन कार्यकर्त्यांची बैठक बोलावून नवीन कार्यकारिणी त्या बैठकीत जाहीर केली जाणार आहे.