Thursday, December 26, 2024

/

तीन आंतरराज्य दुचाकी चोर गजाआड

 belgaum

बेळगाव लाईव्ह: शहरातील खडे बाजार पोलिसांनी विजापूर जिल्ह्यातील तिघा आंतरराज दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या जवळील 6 लाख 79 हजार किंमतीच्या 14 दुचाकी जप्त केल्या आहेत.

महेश निंगप्पा मदार वय 23 मूळचा रा. कुरबरदिनी ता. कोल्हार सध्या अथार्गा रा. तालुका इंडी विजापूर, अमीर बाबू एळगी वय 19 रा.अथर्गा इंडी विजापूर आणि प्रशांत मोरे वय 21 रा. रा.अथर्गा इंडी विजापूर अशी चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरट्यांनी बेळगाव गोवा अथनी विजापूर आणि महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे. पोलिसांनी यांच्या कडून 1 टी व्हीं एस अपाचे, 2 बजाज पल्सर एन एस मोटार सायकल,5 हिरो होंडा स्पलेंडर, 2 होंडा शाईन,1 बजाज प्लटिन,1 हिरो होंडा स्पलेंडर प्रो दुचाकींचा समावेश आहे.

या जप्त केलेल्या दुचाकित खडे बाजार पोलीस स्थानक व्याप्तीत चोरलेल्या 4, अथणी पोलीस स्थानक व्याप्तीत 1 दुचाकींचा समावेश आहे तर इतर जप्त केलेल्या गाडी मालकांचा शोध सुरू आहे.

डी सी पी स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली खडे बाजार पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर आदी सहकाऱ्यांनी सदर दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

Bike theft

18 जून रोजी खडे बाजार पोलीस स्थानक व्याप्ती मध्ये झालेल्या दुचाकी चोरीचा तपास लावताना या आंतर राज्य टोळीचा पर्दाफाश बेळगाव पोलिसांनी केला आहे. पोलीस आयुक्त डॉ सिद्धरामाप्पा यांनी तपास अधिकारी आणि खडे बाजार पोलिसांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.