Friday, January 10, 2025

/

लक्ष विचलित करून 4 लाखांच्या महागड्या साड्या लंपास

 belgaum

बेळगाव लाईव्ह :दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून एका पुरुषासमवेत आलेल्या पाच ते सहा महिलांच्या टोळक्याने सुमारे 4 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या रेशमी साड्या लंपास केल्याची घटना खडेबाजार येथे एका कापड दुकानांमध्ये काल उघडकीस आली.

दीपावलीच्या खरेदीसाठी बाजारात होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा सध्या चोरटे व भामट्यांकडून घेतला जात आहे. शहरातील खडेबाजार येथील एका कापड दुकानांमध्ये काल शुक्रवारी दुपारी पाच-सहा महिला व त्यांच्यासोबत एक पुरुष खरेदीच्या बहाण्याने आले होते.

गर्दीचा फायदा घेत या टोळक्याने दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून महागड्या रेशमी साड्या लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. सदर साड्यांची किंमत 4 लाख रुपयांहून अधिक असल्याचे समजते.

याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज वरून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.