Friday, December 20, 2024

/

राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त डॉ. रुपेश साळुंखे यांच्यातर्फे आयुर्वेद प्रचार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :दिवाळीतील धनत्रयोदशीचा दिवस हा धन्वंतरी पूजन तसेच राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस म्हणून आचरणात आणला जातो.

या निमित्ताने बुधवार पेठ, टिळकवाडी येथील अत्रिवरद आयुर्वेदिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आणि सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ. रुपेश साळुंखे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यामध्ये धन्वंतरी याग आणि महापूजन कार्यक्रम यासह आयुर्वेद प्रचार आणि जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे . अशी माहिती डॉ. रुपेश साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की आयुर्वेदिक ही भारतीय उपचार पद्धती आहे . आता संपूर्ण जगाने या पद्धतीचा स्वीकार केला आहे.Rupesh salunke

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच आयुर्वेद दिनाचे आचरण करण्यात येत आहे .

नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील उपयुक्त वनौषधी पासून निरामय आणि निरोगी जीवनशैली शिकविणारा आयुर्वेद अत्यंत आवश्यक आहे . यामधून अनेक विकारांवर उपचार करता येतात. याची माहिती नागरिकांनी घेणे गरजेचे आहे . असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.