बेळगाव लाईव्ह : भारतीय संस्कृतीत बोटा बोटा तून अंगणात संस्कृती उतरते, जन माणसाचे प्रतिबिंब त्यात उतरलेले असते. बेळगाव सह सीमा भागात मराठी माणसाचा श्वास आणि ध्यास म्हणजेच मराठी संस्कृती आहे. बेळगाव तालुक्यातील येळळूरच्या मातीत मराठी संस्कृतीचा इतिहास मांडणारी रांगोळी साकारली आहे.
सारा बंदीच्या लढ्या पासून कन्नड सक्तीचे आंदोलन असो किंवा अगदी अलीकडचे गावच्या वेशीवरील महाराष्ट्र राज्य फलक हटवणे आंदोलन असो सीमा लढ्याचे केंद्र बिंदू म्हणून लढा देत असलेल्या येळळूर गावात दिवाळी निमित्त घरासमोर घातलेल्या रांगोळीतून देखील मराठी जनतेच्या भावना व्यक्त झाल्या आहेत.
दिवाळी पाडव्याच्या निमित्त येळळूर शिवाजी रोड येथे रांगोळीतुन सादर केली अखंड महाराष्ट्राची मागणी कधी होणार? अशी रांगोळी सध्या चर्चेचा विषय बनली आहे . दरवेळी सण असो किंवा उत्सव सुख असो किंवा दुःख बेळगावातील मराठी जनता मातृभाषा मराठी संस्कृती आणि सीमा प्रश्न अग्रक्रमाने घेत असते दिवाळीच्या घरासमोर रेखाटलेल्या रांगोळीत देखील संयुक्त महाराष्ट्र चळवळ आठवण करून देणारे सादरी करण झाले आहे.
बेळगाव,कारवार,निपाणी,बिदर,भलकी सह “अखंड महाराष्ट्र” झालाच पाहिजे जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, या जयघोषातच प्रतिवर्षी बेळगांव येथे दिवाळी सणाला सळसळत्या उत्साहात आणि चैतन्यमयी वातावरणात सुरुवात होते.
पण महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सुस्त मुडदाड राज्यकर्त्यांना संदेश म्हणून महाराष्ट्र राज्याची प्रतिमा काढून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपले बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या स्मृती महाराष्ट्रात व सिमाभागात जागवल्या जातात.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी शेकडो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली बेळगांव मधुन अनेकांनी हुतात्म्य पत्करले . महाराष्ट्र सर्वच बाबतीत देशभरात आघाडीवर आहे. पण बेळगांव सह सिमाभागावर महाराष्ट्र व केंद्र सरकारचा अन्याय झाला. व महाराष्ट्र अपुरा राहिला आहे.प्रत्येक सीमावासियांच्या मनातील हा प्रश्न कधी सोडवला जाईल? असा रांगोळीतुन संदेश देण्यात आला आहे.