बेळगाव लाईव्ह: कर्नाटक राज्यातील एकमेव कॅन्टोन्मेंट असलेल्या बेळगावच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के आनंद यांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
गेल्या सहा दिवसापासून कॅन्टोन्मेंट बोर्डावर सीबीआय अधिकाऱ्यांनी धाड टाकुन चौकशी सुरू केली होती त्या पार्श्वभूमीवर सीईओ के आनंद यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डात कर्मचारी भर्तीत झालेल्या घोटाळयाच्या आरोपानंतर सीबीआयने बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची चौकशी सुरू केलेली आहे.
शनिवारी सकाळी बेळगाव शहरातल्या कॅम्प भागातील त्यांच्या शासकीय निवासस्थानी ही घटना उघडकीस आली झाली आहे. घटनास्थळी कॅन्टोन्म बोर्ड परिसरातील नागरिकांनी येथे गर्दी केली होती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने देखील या ठिकाणी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे.
मूळचे तमिनाडू मधील चेन्नईचे असणारे के आनंद हे इंडीयन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस अधिकारी म्हणून गेल्या दीड वर्षापासून बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करत होते.
शनिवारी सकाळी घरचा दरवाजा उघडला नाही त्यामुळे याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी दरवाजा खोलला असता घरामध्ये के आनंद यांचे शव मिळाले आहे.या घटनेने बोर्डात खळबळ माजली आहे.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी , डी सी पी रोहन जगदीश आणि खडे बाजार पोलीस ए सी पी अरुकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
गेल्या आठवडाभरापासून बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ऑफिसवर सीबीआयची चौकशी सुरू आहे नोकर भर्ती प्रक्रियेत घोटाळा केल्याच्या आरोपावरून ही चौकशी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्या असल्याचे समोर येत आहे. घटनेची माहिती आनंद यांच्या तमिळनाडू मधील आई वडील कुटुंबीयांना देण्यात आली असून सायंकाळी पर्यंत त्यांचा मृतदेह तमिळनाडू मधील होसुरला अंतिम संस्कारासाठी पाठवला जाणार आहे. के आनंद हे अविवाहित तरुण अधिकारी होते.