Tuesday, November 26, 2024

/

रिक्षाच्या धडकेने अर्भकाचा गर्भवतीच्या पोटातच मृत्यू

 belgaum

बेळगाव लाईव्ह:भरधाव ऑटो रिक्षाने धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी घडली. शहापूर महात्मा फुले रोडवर काल रात्री हा अपघात घडला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, लक्ष्मीनगर वडगाव येथील वैशाली (वय 23) ही गर्भवती महिला आपला भाऊ व बहिणी समवेत गुरुवारी रात्री कामानिमित्त महात्मा फुले रोड परिसरात आले होते.

त्यावेळी श्री दानम्मादेवी मंदिराजवळ वैशाली तिची बहीण व इतर कुटुंबीय उभे असताना एका भरधाव ऑटोरिक्षाने रस्त्याशेजारी थांबलेल्या वैशालीला धडक दिली.

त्यानंतर वैशालीला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय चांचणीत तिच्या पोटातील 6 महिन्यांच्या अर्भकाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.

ऑटोरिक्षाने धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात वैशालीसह एक 12 वर्षाची बालिका व अन्य एक जण असे एकूण तिघेजण जखमी झाले आहेत. अपघातात अर्भकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी रहदारी दक्षिण विभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.