बेळगाव लाईव्ह: मित्रांना भेटायला गेलेल्या एका सैनिकावर अनोळखी व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना गणेशपूर येथे घडली आहे. महाराष्ट्रातील चंदगड येथील रहिवासी असलेल्या परशुराम पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला या घटनेचा vdo सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बेळगाव शहराच्या हद्दीसमोरील रस्त्याच्या मधोमध गणेशपूर हल्लेखोरांनी या जवानावर हल्ला केला. त्याला पायाने लाथ मारून तेथून पळ काढला.
हल्ल्यात जखमी झालेल्या या जवानास तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कॅम्प पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे.
तीन दिवसांपूर्वी जवानावर प्राणघातक हल्ला झाला होता, तो उशिरा उघडकीस आला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जवान परशुराम जम्मूमध्ये कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना बेळगावातील कॅम्प पोलीस ठाण्यांतर्गत घडली असून पोलीस स्थानकात फिर्याद दाखल झाली आहे.