बेळगावजवळच्या पंतबाळेकुंद्री येथे श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा 118 वा पुण्यतिथी उत्सव दि. 30 ऑक्टोबर ते दि 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि 30 ऑक्टोबर रोजी सकाळी बेळगावच्या समदेवी गल्लीतील पंतवाडा येथून प्रेमध्वजाची मिरवणूक पंतबाळेकुंद्रीकडे प्रस्थान करेल. रात्री मुख्य समाधीमंदिर आवारात प्रेमध्वजारोहण होऊन उत्सवाला सुरुवात होणार आहे.
दि 31 ऑक्टोबर रोजी सकाळी गावात पालखी मिरवणूक होईल आणि रात्री मंदिर परिसरात पालखी सेवा होणार आहे.
दि 1 नोव्हेंबर रोजी दुपारी महाप्रसाद होईल. सायंकाळी श्रींची पालखी मंदिरातून गावातील वाड्यात पोचल्यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे.