बेळगाव लाईव्ह: मी शांत आहे, म्हणजे दुर्बल आहे, असे कोणी समजू नये. पक्षाला मीच यश मिळवून दिले आहे. पण जिल्ह्याच्या राजकारणात बाहेरच्यांचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे.
जारकीहोळी आणि उप मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात सध्या कोल्डवॉर सुरू झाले आहे. त्यातच शिवकुमार यांनी बुधवारी बेळगाव दौरा केला, पण त्यांच्या स्वागताला एकही आमदार उपस्थित नव्हता, त्यामुळे नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
याबाबत आज बंगळूर येथे सतीश यांना पत्रकारांनी विचारले होते, ते म्हणाले, मी बेळगावात नसणार, याची कल्पना शिवकुमार यांना दिली होती. जिल्हाध्यक्ष बाहेर गेले असल्यामुळे त्यांच्या स्वागताला कोणी आले नसेल, पण ही बाब विशेष नाही.
बाहेरच्या लोकांनी जिल्ह्याच्या राजकारणात हस्तक्षेओ करू नये, याबाबत आधीच पीएलडी बँक निवडणुकीवेळी निर्णय झाला आहे. अधिकाऱ्यांच्या बादल्यांचा विषय संपलेला आहे असेही त्यांनी म्हटले आहे
आमदार लक्ष्मण सवदी ही भाजपमधून कॉँग्रेसमध्ये येताना सर्व चर्चा झाल्या आहेत. मी सहा वेळा आमदार आहे, लक्ष्मी हेबबाळकर दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत, त्यांच्यात आणि माझ्यात वाद नाहीत. काही जन पहिल्यांदाच आमदार होऊन मंत्री झाले आहेत..
त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागते. मी शांत आहे, म्हणजे दुर्बल असे, असे कोणी समजू नये, असेही मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.